सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनांच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा सौदा करून आपली क्षमता सिद्ध करू शकेल का?
सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनांच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा सौदा करून आपली क्षमता सिद्ध करू शकेल का?
सोनी सबवरील वंशज मालिकेत एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील संघर्ष, राजकीय डावपेच आणि गुंतगुंतीची नाती यामध्ये गुंफलेल्या कथानकाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. कथा उलगडत जाताना, महाजन कुटुंबातील एक धडाडीची तरुणी युविका (अंजली तत्रारी) महाजन ऑफिसमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू पाहात आहे आणि त्यासाठी आपली क्षमता सिद्ध करण्याची धडपड करत आहे. तिला पावलोपावली एक नवी अडचण सामोरी येत आहे. मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करून युविका हा सौदा कसा पूर्णत्वाकडे नेते ही बघणे रोचक असेल.
सत्य शोधून काढण्यासाठी युविकाला अनेक अडथळ्यांवर मात करावी लागणार आहे, त्यात डीजेचे सतत तिचा तिरस्कार करणे हा सर्वात मोठा अडथळा आहे. युविकाने ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्याचे पाहताच डीजे (माहिर पांधी) तिला मजुरीची आणि किचकट कामे देऊन तिच्या नाकी दम आणतो. ती ऑफिसात टिकू नये असाच त्याचा प्रयत्न आहे. पण, मि. सेनगुप्ताच्या रूपात तिला मोठा दिलासा मिळतो. महाजनांच्या ऑफिसमधून प्रत्येक जण मि. सेनगुप्तांच्या सोबत एक महत्त्वाचा करार करण्यासाठी प्रयत्न करत असताना ती बाजी मारते.
बघा ‘वंशज’ दर सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त सोनी सबवर!
Comments
Post a Comment