सातारा जिल्ह्यातील २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या

सातारा जिल्ह्यातील २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या ब्रेकिंग news कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी काढले बदल्यांचे आदेश

सातारा , दि.२९,(प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढले आहेत. सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याअंतर्गत करण्यात आल्या असून बदलीच्या ठिकाणी संबंधीत अधिकाऱ्यांनी तत्काळ हजर राहून पूर्व अहवाल देण्याच्या सूचना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.

 महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २२ पोटकलम ( २ ) अन्वये , जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून , जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार एकूण २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्हयाअंतर्गत प्रशासकीय कारणास्तव व विनंतीवरून करण्यात आल्या आहेत .  

सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणावरून नव्याने नियुक्ती बदली करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचा तपशील पुढीलप्रमाणे- : सपोनि प्रशांत दतात्रय बधे (प्रभारी उंब्रज), सपोनि सुशिल भास्कर भोसले (प्रभारी लोणंद ),सपोनि शिवाजी बबन भोसले (प्रभारी वाठार ), सपोनि अशिष दिलीप कांबळे (प्रभारी पुसेगाव),सपोनि विजय भागवत गोडसे  (प्रभारी कोयनानगर), सपोनि चेतन मनोज मछले (प्रभारी कराड वाहतुक शाखा), सपोनि अजय लक्ष्मण गोरड (कराड शहर ), सपोनि विशाल किसनराव वायकर (खंडाळा),सपोनि  संजय सजन बोंबले (वाचक पोलीस अधीक्षक),सपोनि सरोजिनी विलास पाटील(कराड शहर),सपोनि संदीप निवृत्ती सूर्यवंशी (कराड शहर), सपोनि सुधीर सुर्यकांत पाटील (स्थानिक गुन्हे शाखा),सपोनि रोहित रमेश फार्णे (सातारा शहर), सपोनि किरण रविद्र भोसले (सातारा शहर), सपोनि अविनाश ज्ञानेश्वर माने (सातारा शहर),सपोनि अशोक हनुमंत हुलगे (फलटण ग्रामीण),सपोनि नवनाथ विभीषण रानगट (फलटण ग्रामीण), सपोनि चिमाणी वैजिनाथ केंद्रे  (शिरवळ),सपोनि संदीप आनंद कामत (पाटण), सपोनि शैलेजा सर्जराव पाटील (कराड तालुका) अशा सर्व नमूद पोलीस अधिकारी यांनी तत्काळ नविन नेमणूकीचे ठिकाणी हजर होवून त्याबाबतचा पूर्तता अहवाल पोलीस अधीक्षक यांना सादर करण्याच्या सूचना आदेशात दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त