सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या रस्त्यांसह, पुल व अन्य विकासकामांसाठी केलेल्या


     सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या रस्त्यांसह, पुल व अन्य विकासकामांसाठी केलेल्या पाठपुरव्यातून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात सुमारे २७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागणार आहेत.
      खटाव तालुक्यातील वडगाव ज.स्वामी येथे कुरणवस्ती रस्ता ग्रा.मा.२७९ वर नांदणी नदीवर मोठा पूल बांधणे कामासाठी ८ कोटी ५० लक्ष रूपये निधी मंजूर झाला आहे.
    कोरेगाव तालुक्यातील सासपडे निसराळे तारगाव वाठार आर्वी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ किमी १६/०० ते १७/५०० ( भाग तारगाव पूल ते तारगाव रेल्वे स्टेशन) चे रुंदीकरण व सुधारणा करणे २ कोटी रूपये. 
      सासपडे निसराळे तारगाव वाठार आर्वी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ किमी २२/०० ते २५/०० (भाग वाठार ते इंगळे वस्‍ती) मधील लांबीचे रुंदीकरण व सुधारणा करणे ३ कोटी रूपये.
     कराड तालुक्यातील रा.मा.१४८ रेठरे खुर्द आटके पाचवड कटपान मळा गोळेश्वर कापील गोळेश्वर कार्वे नाका रस्ता प्रजिमा ८१ किमी ७/०० ते ८/४०० या लांबीत रस्त्याच्या दोन्ही बाजूस आरसीसी गटर बांधणे २ कोटी १० लक्ष रूपये. 
    रा.म.मा.१६६ ई वसंतगड ते तळबीड वराडे हनुमानवाडी शिवडे रस्ता किमी ०/०० ते २/५०० ची सुधारणा करणे २ कोटी रूपये. 
    साकुर्डी बेलदरे तळबीड तासवडे शिरवडे करवडी रस्ता प्रजिमा ६१ किमी ५/०० ते ९/०० पुनर्बांधणी करणे (भाग नाईकबा मंदिर ते तळबीड) ३ कोटी रूपये.
    पाटण मणदुरे पाल काशिळ रस्ता रा.मा.३९८ किमी ३८/०५० व ३८/१०० मधील मोठ्या उंच जीर्ण पुलाची पुनर्बांधणी करणे २ कोटी रूपये. 
    प्रजिमा ५७ ते शिरगाव पेरले खराडे पाडळी हेळगाव रहिमतपूर प्रजिमा ३९ किमी ५/०० ते ७/७०० रस्त्याचे मजबुतीकरण व सुधारणा करणे (भाग रा.म.४ ते पेरले) २ कोटी ५० लक्ष. 
     कालगाव खराडे कवठे कोणेगाव शिरवडे रस्ता प्रजिमा ८३ किमी १०/७०० ते १३/७०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (भाग मसूर रेल्वे स्टेशन ते कोणेगाव) २ कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. याबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्यशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त