अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा कराड सत्र न्यायालयाचा निकाल

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा


 कराड सत्र न्यायालयाचा निकाल



कराड:

       संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या  (रुवले) सुतारवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून केलेप्रकरणी कराड सत्र न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा, पोक्सो कायदयाअंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व १ लाख रूपयाची दंडाची शिक्षा सुनावली. संतोष चंद्रु थोरात (वय ४१)व रा. सुतारवाडी (रूवले) ता. पाटण जि. सातारा असे शिक्षा प्राप्त युवकाचे नाव आहे.


पिडीत अल्पवयीन मुलगी ही ८ वर्षापेक्षा कमी वयाची आहे, हे माहीत असताना सुध्दा चॉकलेटचे आमिष व खेळविणेचे उद्देशाने फुस लावुन जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच तिचा गळा दाबुन हत्या केली. तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने तेथेच असलेल्या ओघळीत, घाणेरीचे झुडपात ७० फुटखोल लपवुन ठेवले. 


 ढेबेवाडी पोलीस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासी अधिकारी ढेबेवाडी पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी आपल्या टीमसह रूवले तेथील नथूराम सुतार यांचे घरावरील सीसी टीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास केला. या प्रकरणी वैदयकीय अधिकारी यांनी दिलेली साक्ष व डी. एन. ए. अहवाल अहवाल, तपास कामात प्राप्त महत्वाचे पुरावे आदी बाबी महत्व पुर्ण ठरल्या. 


यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे एकूण ३३ साक्षीदार तपासले. तसेच बचावपक्षाने आरोपीस साक्षीदार म्हणून तपासले.  न्यायाधीश के. एस. होरे यांनी सहा जिल्हा सरकारी वकील अॅड आर. सी. शहा यांचा युक्तीवाद ग्राहय धरून दि. १९ जुलै  रोजी आरोपीस प्रथमतः दोषी धरत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच पोक्सो कायदयाअंतर्गत २० वर्षे सश्रम करावास व १ लाख रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडीतेचे आई व वडील यांना देण्याचा आदेश केला.


या प्रकरणी विवेक लावंड उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण, तत्कालीन तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार, अभिजीत चौधरी सहा. पोलीस निरिक्षक, ढेबेवाडी पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी महिला पोलिस कॉन्स्टेबल योगिता पवार यांनी सदर खटल्याचे कामकाज पाहिले. 


*वीस दिवसात चार्ज शीट...*


 तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकार्याने हा तपास लवकर करून विशेष म्हणजे वीस दिवसांमध्ये कोर्टामध्ये चार्ज शिट दाखल केले होते.


 

 *३५ वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा*


  गेल्या ३५वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील फाशीची शिक्षा पहिल्यांदाच सुनावली. असल्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निकालाचा अखेर आज शेवट झाला.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त