*किल्ले वसंतगडवर करण्यात आला झाडांचा सहावा वाढदिवस..
टीम वसंतगड ने 2017 साली वसंतगड वरती 350+ झाडे लावले होते. टीम फक्त झाडे लावून थांबली नाहि तर ती झाडे जपण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम करन्यात आले एक एक वेळेस तर किल्ले वसंतगड वरीलकृष्णा तलावातून पाणी बॉटल भरून भरून आणून पानी घातले गेले.. झाडे जागवण्यासाठी होणारी धडपड पाहून वसंतगड गावचे सरपंच व टीम चे मार्गदर्शक श्री. अमितदादा नलवडे यांच्या साह्याने किल्ले वसंतगड वरती झाडे जगवण्याकरिता सोलर पंप देण्यात आला जेणेकरून लावलेले झाडे जगण्याची इच्छाशक्ती अधिक वाढली. प्रत्येक रविवारी झाडांना पाणी घालण्याचे काम सुरळीत चालू झाले. पण हे वाटते तितके सोपे नव्हते प्रत्येक रविवारी जाऊन गडावर झाडांना पाणी घालने. त्या झाडांनाही कदाचित टीमच्या जिद्दीला साथ देऊशी वाटली असेल असेच काही..कित्येक ऊन वारा पाऊस सहन करत ते ठाम उभे राहिले टीमच्या कष्टाची साक्ष देत.. झाडे जगवताना प्रत्येकांच्या डोळ्यां समोर एकच ध्येय असायचे गडावर येणाऱ्या लोकांना गारवा व रान मेवांचा मनसोक्त आनंद घेता यावा या विचाराने मनाशी जिद्ध धरून प्रत्येकाने केलेली धडपडीचा आनंद उत्सव म्हणून झाडांचा वाढदिवस हा प्रत्येक वर्षी उत्कृष्ट पद्धतीने साजरी करन्यात येतोच. त्या प्रमाणेच या वर्षीचा झाडांचा ६ वा. वाढदिवस देखिल जल्लोषातच साजरी करण्यात आला. व तसेच *या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्याभिषेक दिन निमित्त किल्ले वसंतगड वरती साडेतीनशे किलो बियांचे रोपण करण्याचे उपक्रमास सुरुवात देखिल करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून..*
*कराड चे DYSP. श्री अमोल ठाकूर साहेब. कराड चे RTO श्री. चैतन्य कणसे साहेब. तळबीड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल वरुटे साहेब. कराड चे नायब तहसीलदार श्री. युवराज पाटिल साहेब. वसंतगड गावचे सरपंच श्री.अमित नलवडे व टीम वसंतगड चे दूर्गसेवक* यांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला..
Comments
Post a Comment