*पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा बैठक घेतली.*
*पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा बैठक घेतली.*
पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विभागाकडील सामान्य विकास व पद्धती सुधारण्यासाठीची कामे, सार्वजनिक बांधकामकडील कामे, ग्रामपंचायत, ग्रामीण रस्ते विकास, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, अंगणवाडी व शाळा दुरुस्ती, जलजीवन मिशन, कोयना पुनर्वसन आदी विषयांतील कामांच्या सद्यस्थितीचा मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा करण्यात आला असून यामधील कामे विहीत मुदतीत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याबाबत यावेळी त्यांनी निर्देश दिले. कामांची निवड करत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, तसेच जे ठेकेदार विहीत मुदतीत व गुणवत्तापूर्ण काम करत नसतील अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले.
याशिवाय जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे विविध यंत्रणा राबवून गतीने पूर्ण करून घेण्यात यावी. महाबळेश्वर तापोळा या ठिकाणी पर्यटन विकासाला चालना देणारी कामे तातडीने मार्गी लावावीत. धोकादायक स्थिती असणाऱ्या भागातील लोकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्याबाबत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. कोयना पुर्नवसनाच्या कामासाठी निधी उपलब्ध असून त्यासाठीच्या आवश्यक प्रशासकीय मान्यतेसाठी यंत्रणांनी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment