Karad पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस पलटी

Karad  पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस  पलटीहोऊन भीषण अपघात झाला.  या अपघातात चालक व क्लिनर गंभीर जखमी झाला असून पंधरा ते वीस प्रवासी  जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.   गुरुवार दि.६  रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस  विजापूर ते सातारा जात होती.  या अपघातातून 
तसेच १५ ते २० प्रवासी बचावले. 
   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महामार्गावर शिवडे तालुका कराड गावचे हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर  विजापूर ते सातारा जाणारी एसटी बस पलटी झाली. या बसमधून सुमारे पंधरा ते वीस  प्रवासी प्रवास करत होते. अचानक बस पलटी झाल्याने प्रवासांना मार लागला. तसेच या अपघातात चालक व क्लीनर गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य केले. दरम्यान उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची पंचनामा सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त