सातारा सेतूमधील अपहाराची सातारा जिल्हाधिकारी यांनी घेतली गंभीर दखल सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
सातारा सेतूमधील अपहाराची सातारा जिल्हाधिकारी यांनी घेतली गंभीर दखल सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
सातारा प्रांताधिकाऱ्याना दिले चौकशीचे आदेश
सातारा,(प्रतिनिधी ): सातारा तहसील कार्यालयातील सेतूमध्ये जुलै २२ ते जून २३ या वर्षाच्या कालावधीमध्ये करारानुसार ऑनलाईन ऐवजी ऑफलाइन प्रतिज्ञापत्र नोंद करून १४ लाख ७१ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, शासनाने विविध प्रकारची प्रतिज्ञापत्रे, दाखले,प्रमाणपत्र, उतारे अशी कागदपत्रे नागरिकांना एकाच छताखाली मिळावीत यासाठी नागरी सुविधा केंद्र म्हणजेच सेतूच्या माध्यमातून एक खिडकी योजना अंमलात आणली. त्यासाठी कराराने ठेकेदार नेमण्यात येऊन त्यांचेकडे सुविधा देण्याचे काम सोपविले.परंतु सातारा तहसील कार्यालयातील सेतू विभागाच्या ठेकेदाराने तज्ञ मनुष्यबळ, सक्षम यंत्रणा नसतानाही काम घेऊन येथील सुविधा पुरविताना हलगर्जीपण केला एवढेच नव्हे तर हे काम करत असताना शासनाची फसवणूक केले असल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त माहितीतून सिद्ध झाले.
जुलै २०२२ ते जून २०२३ अखेर ५१ हजार ७९० इतकी प्रतिज्ञापत्र सातारा सेतु कार्यालयातून दिले गेले आहेत त्यापैकी केवळ ८,५२३ इतक्या प्रतिज्ञापत्राचे ऑनलाईन रेकॉर्ड उपलब्ध झाले आहे तर ४३,२६७ इतक्या प्रतिज्ञापत्राची ऑनलाईन नोंदणीच केली नाही त्यामुळे प्रतिज्ञापत्रासाठी आकारले जाणारे ३४ रुपयाचे शुल्क लक्षात घेता संबंधित ठेकेदारांनी १४ लाख ७१ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पत्रकार पद्माकर सोळवंडे यांनी दाखल करून ठेकेदारासह सेतूवर नियंत्रणाचे काम सोपविलेल्या तहसिलदार व इतर अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती.
दरम्यान,आज सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सातारा प्रांताधिकारी यांना चौकशीचे आदेश देऊन तातडीने या प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
Comments
Post a Comment