सातारा जिल्ह्यातील २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या

सातारा जिल्ह्यातील २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या ब्रेकिंग news कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी काढले बदल्यांचे आदेश सातारा , दि.२९,(प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढले आहेत. सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याअंतर्गत करण्यात आल्या असून बदलीच्या ठिकाणी संबंधीत अधिकाऱ्यांनी तत्काळ हजर राहून पूर्व अहवाल देण्याच्या सूचना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २२ पोटकलम ( २ ) अन्वये , जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून , जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार एकूण २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्हयाअंतर्गत प्रशासकीय कारणास्तव व विनंतीवरून करण्यात आल्या आहेत . सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणावरून नव्याने नियुक्ती बदली करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचा तपशील पुढीलप्रमाणे- : सपोनि प्रशांत दतात्रय बधे (प्रभ...