कराड येथे मंगळवारी स्त्रीशक्ती समाधान शिबिर
कराड येथे मंगळवारी स्त्रीशक्ती समाधान शिबिर
कराड, दि.28: महिला व बाल विकास विभागाच्या वतीने कराड तालुक्यासाठी दि.30 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर बचत भवन (दैत्य निवारणी मंदिर शेजारी,) या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
कराड तालुक्यातील महिलांकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. कराड तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुप्रिया पवार व नागेश ठोंबरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment