कराड येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

कराड  येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. कराड येथील प्रशासकीय इमारतीत लाच घेण्याचे प्रकार आता सर्रास समोर येवू लागले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे काम हे आता पैसे दिल्याशिवाय होत नसल्याची भावना आता लोकांच्यात निर्माण होवू लागली आहे. आज केलेल्या कारवाईत रामचंद्र श्रीरंग पाटील (वय - 70 वर्षे, नोकरी - लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत आ फीस कराड) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय- 70 वर्षे, नोकरी- लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत फीस कराड) या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघाकरिता प्रत्येकी 10 हजार रूपयांची मागणी करून असे 20 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात सापडले.


येरवळे (ता. कराड) गावच्या नऊ शेतकरी यांचेकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावा प्रतिज्ञापत्र घेतलेले होते. त्या प्रतिज्ञापत्रा मूल्यांकन प्रक्रिये बाबत पाठपुरावा करण्याकरीता तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कराड कार्यालय येथे गेले असता, त्यांना आरोपी लोकसेवक एक व दोन यांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले..

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस निरीक्षक विक्रम पवार, स. पो. उप. नि. शंकर सावंत, पो.ना.निलेश राजपूरे, पो.शि. विक्रमसिंह कणसे यांनी सापळा रचून केली.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त