*रहिमतपूर ता.कोरेगांव येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ

*रहिमतपूर ता.कोरेगांव येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच हिंद नगरवाचनालयाचे, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.*

यावेळी अर्थसंकल्प अनुदान मार्च २०२१ अंतर्गत शिरगांव पेरले पाडळी वाठार सुर्ली रहिमतपूर प्र.जि.मा. ३९ कि.मी. २८/६०० ते ३३/०५० चे रुंदीकरण व सुधारणा करणे (भाग- सुर्ली ते रहिमतपूर) रक्कम रु.६.०० कोटी, ब्रम्हपूरी अंगापूर फत्त्यापूर वेणेगांव कालगांव रस्ता प्र.जि.मा. ११० कि.मी ०/००० ते ५/४०० चे रुंदीकरण व सुधारणा करणे (भाग- रहिमतपूर ते ब्रम्हपूरी) रक्कम रु.८.०० कोटी या कामांचे भूमिपूजन, आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत नगरपरिषदेस घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी दोन घंटागाड्यांचे लोकार्पण व जिल्हा नियोजन विकास निधीतून मंडलअधिकारी व तलाठी कार्यालय बांधकाम करणे या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षिरसागर, कोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल पाटील, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती  नवनिर्वाचित सभापती जयवंत घोरपडे, दिलीप अहिरेकर,  संभाजीराव गायकवाड, राहुल निकम, बापूसो चव्हाण, काकासो जगताप, ननावरे सर, काकासो गायकवाड, जयवंतराव घोरपडे, भागवत घाडगे, सतीश गायकवाड, डॉ. देशमुख, सौ.साधना चव्हाण, सौ.वैशाली भोसले, अजितराव भोईटे, जयहनुमान घाडगे, आनंदा कोरे, भानुदास भोसले, चांदभाई आतार, नंदकुमार पाटील, अविनाश माने, दिलीप कदम, विद्याधर बाजारे, बेदिल माने, जयवंत माने, सचिन बेलागडे, हिम्मत माने, विश्वास भोसले, शशिकांत भोसले, विकास पवार (सर), सुभाष जाधव, संजय पवार, अरुण माने, प्रकाश माने, चंद्रकांत माने, राजेश कदम, तहसीलदार अमोल कदम, पीडब्ल्यूडी विभागाचे उपअभियंता डी.जे पाटील, शाखाअभियंता राजेश धुमाळ, श्री साखरे, तसेच इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त