कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर कराड, ता. १२ कराड वार्ता न्युज : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने सन २०२४-२५ या ऊसगाळप हंगामासाठी येणार्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जयवंत शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन, शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा गळीत हंगाम निवडणुकांच्या धामधुमीमुळे उशिरा सुरु झाला. अशावेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना ऊसाला किती दर देणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अशावेळी कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सने सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडत, यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. कृष्णा कारखान्याच्या...
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचे स्वरुप समजावून घेतले. तसेच मतदारसंघातील विविध नागरी समस्या तातडीने सोडविण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना आ. डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रशासनाला दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून स्वत:चे पक्के घर मिळविणे हा या नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे येत्या ५ वर्षात एकही माणूस झोपडपट्टीत न राहता, त्याला स्वत:चे हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्याची ग्वाही आ.डॉ. भोसले यांनी दिली. आ.डॉ. भोसले पुढे म्हणाले, कराड शहर हे देशाच्या नकाशावर सर्वांत देखणे शहर म्हणून नावारुपाला आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने शहराचा...
*राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त कराड व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी कोपर्डे हवेली व हजारमाची विभागातील मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल मुंबई या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यासाठी ते रुग्ण आज हॉस्पिटलकडे राजयोग मंगल कार्यालय कोपर्डे हवेली येथून रवाना झाले असून, यावेळी रुग्णांना घेऊन जात असलेल्या लक्झरी बस मध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांनी रुग्णांची भेट घेऊन संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.* *सदर शस्त्रक्रियेसाठी ट्रॅव्हल्स गाडीच्या माध्यमातून रुग्णांना ने - आन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, रुग्णांच्या राहण्याची जेवणाची चहापानाची सोय रुग्णालयामार्फत करण्यात आलेली आहे.*
Comments
Post a Comment