*लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे ६ जून रोजी प्रकाशन

*लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे ६ जून रोजी प्रकाशन*

*- राजभवन येथे ६ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता महामहीम राज्यपाल मा. रमेशजी बैस यांच्या हस्ते प्रकाशन*

*- मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रमुख उपस्थिती*

*- ज्येष्ठ पत्रकार-संपादक मधुकर भावे चरित्रग्रंथाचे लेखक*

*मुंबई :* महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून देणाऱ्या 'दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई' चरित्रग्रंथाचे प्रकाशन मंगळवार, ६ जून २०२३ रोजी होत आहे. महामहीम राज्यपाल मा. रमेशजी बैस यांच्या शुभहस्ते आणि मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राजभवन येथे सायंकाळी ५ वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दिली. 

महाराष्ट्राच्या गृह, सार्वजनिक बांधकाम, कृषी, शिक्षण आदी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत  राज्याच्या उभारणीत अमूल्य योगदान देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे लेखन/संपादन ज्येष्ठ पत्रकार-संपादक मधुकर भावे यांनी केले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राबविलेली धोरणे, घेतलेले क्रांतिकारी निर्णय आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान यांचा सविस्तर आढावा या चरित्रग्रंथात घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या संकल्पनेतून हा चरित्रग्रंथ आकारास आला असून दौलत उद्योग समूहाच्या विद्यमाने या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा राजभवनातील दरबार हॉल येथे ६ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महामहीम राज्यपाल मा. रमेशजी बैस आणि मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या साक्षीने हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. 


.........

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.