सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ मालिकेत, तारा आपल्या भावाच्या शस्त्रक्रियेत डॉ. ध्रुवला मदत करून, डॉक्टर बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार

सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ मालिकेत, तारा आपल्या भावाच्या शस्त्रक्रियेत डॉ. ध्रुवला मदत करून, डॉक्टर बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार का?
सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ ही एक सुंदर प्रेमकथा आहे, जी २१ व्या शतकातील ध्रुव (ईशान धवन) आणि १७ व्या शतकातील ताराप्रिया (रिया शर्मा) यांच्यातील विलक्षण प्रेम दर्शवते. या मालिकेचे आकर्षक कथानक, मंत्रमुग्ध करणारा साऊंडट्रॅक आणि ध्रुव व तारा यांच्यात फुलणारा रोमान्स यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
ताराने आपल्या भावाच्या म्हणजे महावीरच्या (कृष्णा भारद्वाज) शस्त्रक्रियेत आपल्याला मदत करावी असा आग्रह करणारा ध्रुव प्रेक्षकांना आगामी भागांत दिसेल. तर, तारा ‘हे पाऊल उचलावे का’ या दुविधेत दिसेल. घटनांच्या नाट्यमय वळणावर, ताराला आपली मदतनीस बनवण्यावरून ध्रुव राज सभेसमोर वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. एकंदरित, त्या दोघांच्या अडचणीत भर पडणार आहे, कारण राज सभेतील सर्वजण या कल्पनेला विरोध करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त