पावसाळ्यापुर्वी नदीतीरावरील खाजगी उपसा सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत आवाहन
सातारा दि.18: कोयना, तारळी, उत्तरमांड, वांग, उत्तरवांग नद्या तसेच या नद्यावरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, व महिंद चाफळ चाळकेवाडी लघू पाटबंधारे तलाव इत्यादी ठिकाणी यापूर्वी अतिवृष्टीने उदभवलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांच्या पंपाचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेले आहे. यंदाचा पावसाळा सुरु होण्यापूर्वी खाजगी उपसा सिंचन योजनेचे पंप शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वखर्चाने सुरक्षित स्थळी तात्पुरत्या स्वरुपात हलवणेत यावेत, असे आवाहन उप कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी केले आहे. पावसाळ्यात शेतकऱ्याच्या पंपाचे नुकसान झाल्यास त्यांची जबाबदारी शेतकऱ्यांची असेल त्यास पाटबंधारे कार्यालय जबाबदार राहणार नाही असे कोयना सिंचन विभागाने प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
Comments
Post a Comment