राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कराड उत्तर यांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात तसेच राज्यातील सामान्य लोकांना दैनंदिन कामकाजात भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत आज कराडच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कराड उत्तर यांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात तसेच राज्यातील सामान्य लोकांना दैनंदिन कामकाजात भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत आज कराडच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत.... आज राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकाना वेगवेगळ्या अडचणींना सामोर जावं लागत आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, तूर या शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकाचं नुकसान होऊनही विम्याची नुकसानभरपाई मिळत नाही. नोकरभरतीसाठी हजार हजार रुपये शुल्क आकारूनही होत असलेली पेपरफुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे. राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच पण महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत आणि त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत. कामानिमि