खा.श्रीनिवास पाटील यांच्या कुटुंबीयांचे खा.सुनिल तटकरे यांच्याकडून सांत्वन कराड :      सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या दिवंगत पत्नी सौ.रजनीदेवी पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीचे नेते, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आदरांजली वाहिली. रजनीदेवी पाटील यांच्या निधनाने खूप दुःख झाले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी त्या शक्ती स्तंभ होत्या. त्यांनी कायम सामाजिक कार्यासाठी खा.पाटील यांना प्रेरीत केलं आणि त्यांचा उत्साह वाढवला. अशा शब्दांत डॉ.खा.सुनिल तटकरे यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी खा.श्रीनिवास पाटील तसेच त्यांचे सुपुत्र सारंग पाटील उपस्थित होते.    सौ. रजनीदेवी पाटील यांचे शुक्रवार, दि. १२ रोजी पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले. खासदार सुनिल तटकरे यांनी शनिवार दि.२० रोजी सकाळी ११ वाजता गोटे, ता.कराड येथील खा.श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी अनेक आठवणीसह संसदेतील विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी जितेंद्र डुबल, राजेश पाटील-वाठारकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

खा.श्रीनिवास पाटील यांच्या कुटुंबीयांचे खा.सुनिल तटकरे यांच्याकडून सांत्वन
 सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला

कराड : 
     सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या दिवंगत पत्नी सौ.रजनीदेवी पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीचे नेते, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आदरांजली वाहिली. रजनीदेवी पाटील यांच्या निधनाने खूप दुःख झाले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी त्या शक्ती स्तंभ होत्या. त्यांनी कायम सामाजिक कार्यासाठी खा.पाटील यांना प्रेरीत केलं आणि त्यांचा उत्साह वाढवला. अशा शब्दांत डॉ.खा.सुनिल तटकरे यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी खा.श्रीनिवास पाटील तसेच त्यांचे सुपुत्र सारंग पाटील उपस्थित होते.
    सौ. रजनीदेवी पाटील यांचे शुक्रवार, दि. १२ रोजी पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले. खासदार सुनिल तटकरे यांनी शनिवार दि.२० रोजी सकाळी ११ वाजता गोटे, ता.कराड येथील खा.श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी अनेक आठवणीसह संसदेतील विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी जितेंद्र डुबल, राजेश पाटील-वाठारकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त