*आदर्श आगाशिवनगरमध्ये सुभाषचंद्र बोस यांना जयंती दिनी अभिवादन.*

*आदर्श आगाशिवनगरमध्ये सुभाषचंद्र बोस यांना जयंती दिनी अभिवादन.* 
      "तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा l" असं म्हणून युवकांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेऊन ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवणारे सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सचिन शिंदे.शिशु विहारच्या मुख्याध्यापिका- लता नलवडे व विद्यार्थीनी  प्रतिनिधी कुमारी-गार्गी देवकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
   कार्यक्रमाचे‌ प्रास्ताविक सौ.शबाना मुल्ला यांनी केले.आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून युवकांना व देशवासीयांना एकत्रित करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले योगदान अद्वितीय असल्याचे म्हटले.
सौ.शितल भिसे यांनी नेताजींचे जीवन चरित्र व देशासाठी दिलेले बलिदान आजही युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.
    सांस्कृतिक विभाग प्रमुख- सौ.प्राजक्ता‌ पाटील  यांनी सुभाषचंद्र बोस हे सर्वात प्रसिद्ध सेनानी ,नेतृत्वगुण संपन्न व करिष्माई वक्ते होते. त्यांच्यावर भगवतगीतेचा प्रभाव होता.त्यांनी समाजवादी धोरणांसाठी व स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वापरलेली सशक्त रणनीती विश्वसहार्य आहे. असे मत व्यक्त केले. 
           यानंतर विद्यार्थी भाषणे झाली.विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सुभाष बाबू यांच्या व्यक्तित्वाचे पैलू  सांगितले.
     सौ.रंजना कांबळे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात