घरगुती वापराच्या धोकादायक गॅस सिलेंडर मुळे अजून किती कराडकरांचे जीव जाणार आहेत... तातडीने उपाययोजना करण्याबाबत.. नवाजबाबा सुतार राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांची मागणी
घरगुती वापराच्या धोकादायक गॅस सिलेंडर मुळे अजून किती कराडकरांचे जीव जाणार आहेत... तातडीने उपाययोजना करण्याबाबत.. नवाजबाबा सुतार राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांची मागणी
गेल्या काही महिन्यापासून कराडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन कुटुंबातील चार लोकांची गॅस सिलेंडर स्पोर्ट मुळे दुर्दैव मृत्यू झाले आहे या मृत्यूचे कारण गॅसची गळती झाल्यामुळे झाले असल्याचे शासकीय अहवाल आले आहेत. या अहवाला नंतर कराड मधील कुठल्याही गॅस एजन्सीने कराड मधील कोणत्याही घराची तपासणी केलेली आहे का..? प्रशासकीय यंत्रणा याबाबत गप्प का...? असे प्रश्न कराडकरांना पडले आहेत...?
प्रशासकीय यंत्रणा व गॅस कंपण्या अजून किती लोकांची बळी जाण्याची वाट आपण बघत आहेत, कोणतीच ठोस कारवाई व उपाययोजना का होत नाहीत...? तरी अशा स्फोटांमध्ये कोणत्या एजन्सीचे गॅस सिलेंडर होते व त्यांनी या साठी काय उपयोजना केल्या आहेत याची सकल चौकशी होणे गरजेचे आहे तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना कंपणी विमा आर्थिक भरपाई व मदत मिळणे आवश्यक आहे तसेच या स्फोटांचा गांभीर्याने विचार व चौकशी होऊन जो दोषी आहे त्यांच्यावर कायदेनुसार कडक कारवाई करण्यात यावी व अशा घटना संपुर्ण कराड पंचक्रोशीत पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेतली जावी. संबंधित शासकीय यंत्रणा व गॅस कंपण्या कडुन दखल घेऊन तातडीने उपाययोजना व कारवाई तसेच वारसांना विमा आर्थिक सहकार्य मिळाले नाही तर आम्हाला लोकहितासाठी नाईलाजाने आम्ही आंदोलने करावी लागतील असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य नवाज बाबा सुतार मा. प्रांताधिकारी साहेब कराड यांना निवेदन देण्यात आले यावेळी रमजान भाई मांगलेकर चांदसाब निशाणदार सिद्दीक बागवान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment