लोकसंग्रह नेता मा. रामकृष्ण वेताळ वाढदिवस विशेषअकेला चला था,लोक जुडते चले गये,और कारवा बन गया.

लोकसंग्रह नेता 
मा. रामकृष्ण वेताळ 
वाढदिवस विशेष
अकेला चला था,
लोक जुडते चले गये,
और कारवा बन गया.
कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला
 नदी जशी उगमापाशी खूप लहान असते. जसजशी पुढे वाहत जाते तस तसे तिचे पात्र विस्तारत जाते. अशीच काहीशी परिस्थिती रामकृष्ण वेताळ यांची आहे. आज १० जानेवारी मा. रामकृष्ण वेताळ साहेब यांचा वाढदिवस, हा वाढदिवस “ जनउत्सव ” म्हणून कराड उत्तर मध्ये साजरा केला जातो. सुर्ली ता. कराड यासारख्या लहानशा गावात जन्म घेऊन संपूर्ण कराड उत्तरला आपल्या कवेमध्ये घेण्याची किमया ज्यांनी लिलया साकारली आहे, असे नेतृत्व म्हणजे  मा.रामकृष्ण वेताळ. 
मा. रामकृष्ण वेताळ यांचा लोकसंग्रह अफाट आहे. कराड उत्तर मधील प्रत्येक गावात त्यांना मानणारा तरुणांचा एक वेगळा गट निर्माण झाला आहे. हा गट वेगळ्या जिद्दीने आणि उमेदीने आज कार्यरत आहे. त्यांच्या वाढदिवशी सुर्ली या ठिकाणी उसळणारा जनसागर हीच त्यांच्या लोकसंग्रहाची पोहोच पावती आहे. 
लोकसंग्रह करण्यासाठी नेत्यांमध्ये काही आवश्यक गुण असतात. त्यापैकी पहिला गुण म्हणजे लोकांच्या इच्छा समजून घेणे. लोकांच्या समस्या वरती लक्ष देणे. हा गुण रामकृष्ण वेताळ यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे. त्यांच्या सभोवती जमणाऱ्या प्रत्येकाची अपेक्षा काय आहे किंवा त्याची अडचण काय आहे, हे अत्यंत चाणाक्षपणे ते समजून घेतात ही अडचण सोडवण्यासाठी आपल्याला कोणते प्रयत्न करता येतील याबाबत चिंतन करून समोरच्याची अडचण सोडवणे यासाठी ते प्रयत्नशील राहतात. समस्या आणि अडचण सहज सुटत असल्याने त्यांच्याभोवती जमणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. 
संवादशील नेता अशी त्यांची ओळख त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. राजकीय पुढार्‍यांना भेटणे यासाठी आता मध्यस्तांची गरज निर्माण होऊ लागली आहे. मध्यस्थ असल्याशिवाय नेत्याला भेटताच येत नाही त्यामुळे राजकारणात आमचा विठ्ठल बडव्यांनी घेरला आहे. अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. परंतु रामकृष्ण वेताळ यांना भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज नसते. त्यांच्याशी सहज संवाद साधता येतो. आपले मन मोकळे करताना आपण नेत्याशी बोलतोय असे वाटत नाही. कोणीतरी आपली समस्या ऐकून घेतोय आणि ती सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय हीच भावना आज रामकृष्ण वेताळ यांच्या आजूबाजूचा लोकसंग्रह वाढवत निघालेली आहे. 
नीतिमान नेतृत्व हा गुण त्यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. आज समाजामध्ये नीतिमान नेतृत्वाची कमतरता निर्माण होऊ लागली आहे. सर्वत्र स्वार्थ आणि फसवीगिरी याची बजबजपुरी निर्माण झाली असताना वेताळ साहेबांसारखा नीतिमान नेता अनेकांच्या नजरेत भरतो आहे. कोणालाही आपल्या स्वार्थासाठी फसवणे किंवा झुलवत ठेवणे हे गुण त्यांच्यामध्ये नसल्याने त्यांच्याविषयी लोकांच्या मनात आपुलकी निर्माण होत आहे. आज मागील २३ वर्षे सलग ते लोकसंग्रह करण्यासाठी झटत आहेत. २३ वर्ष एकाच पक्षांमध्ये ते काम करत आहेत. सत्ता असो अथवा नसो आपला पक्ष वाढवत राहणे हे काम अखंडित सुरू ठेवल्याने त्यांचा लोकसंग्रह वाढत चालला आहे.
कराड उत्तर मतदारसंघांमध्ये असणाऱ्या सर्व तालुक्यांमध्ये आणि सर्व गावांमध्ये त्यांना मानणारा एक वेगळा गट तयार होऊ लागल्याने त्यांचा लोक संग्रह खूपच वाढत चालला आहे. प्रामाणिकपणे लोकांची कामे करणे लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडणे, या समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि समस्या सोडवून लोकांच्या अडचणी दूर करणे हा त्यांच्या कामाचा आणि यशाचा मार्ग आहे.
 पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांना आदर्श मानून लोकसेवेचे व्रत ते अखंड राबवत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याने अनेक कामे मार्गी लावणे त्यांना सहज शक्य बनत आहे. सातारा जिल्हा उपाध्यक्ष, बाजार समिती तज्ञ संचालक, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस, कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक, अशा चढत्या क्रमाने काम करीत असताना नेहमीच त्यांनी आपल्या पदाला न्याय दिला. पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी लीलया पार पाडण्यासाठी ते २४ x ७ काम करीत असतात. त्यामुळे केंद्राच्या पी.एम. किसान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना, श्रावण बाळ योजना, हर घर तिरंगा मोहीम, मेरी माटी मेरा देश मोहीम, ही पूर्ण क्षमतेने त्यांनी कराड उत्तर मतदारसंघांमध्ये राबवली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.
 महाराष्ट्र शासनाच्या वतीने होत असलेला गतिमान विकास गावागावात पोहोचवण्यासाठी ते अखंड प्रयत्नशील असतात. रस्ते, वीज, पाणी या योजनांसाठी अनेक गावांना निधी मिळवून देताना त्यांनी केलेले प्रयत्न उठवून दिसतात. शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून अनेकांना प्रयत्नपूर्वक त्यांनी मदत मिळवून दिलेली आहे. गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम कराड उत्तर मध्ये अनेक जण बोलून दाखवतात. गरीब पैलवानांना दत्तक घेउन त्यांनी केलेली मदत अनेक कुस्ती मैदानामध्ये ऐकवली जात असते. पक्षाने दिलेला कोणताही उपक्रम हा पक्षादेश मानून पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने ते अखंड काम करीत असतात यामुळेच अतिशय सशक्त अशा बूथ कमिट्या, शक्ती केंद्र आणि वॉरियर्स यांची रचना त्यांनी निर्माण केलेली आहे. सर्वांशी अखंडितपणे त्यांचा संवाद सुरू असतो. या सर्वांशी संवाद सुरू राहिल्याने आणि समस्यांची अखंड सोडवणूक होत राहिल्याने दररोज पक्षाशी आणि त्यांच्याशी जोडल्या जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  
लोकसंग्रहक नेता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. वडील श्रीमंतराव आणि आई इंदूमती यांनी लोक जोडण्याची कला त्यांना शिकवली. हीच कला आज त्यांना अनेकांना आपलेसे करून घेण्यासाठी उपयोगी पडत आहे. या कलेच्या सहाय्याने आणि मदतीने लोकसंग्राहक कशी ओळख निर्माण झालेली आहे. ही ओळखच त्यांना कराड उत्तरच्या क्षितिजावरील चमकता तारा बनवून जाणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
पंखातील बळावर घेतो मी गरुड भरारी,
जनहिताची प्रेरणा हीच अंतरीची माझी उभारी.
 शब्दांकन
के. संदीपजी.
  साहेब प्रेमी

Comments

Popular posts from this blog

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त

*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश " राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क