महायुती सरकार सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध!**- पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब

*महायुती सरकार सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध!*
*- पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब
*कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला

*कराड येथे दलित महासंघ व बहुजन समता पार्टीच्या निर्धार मेळाव्याचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*

शनिवार, २० जानेवारी २०२४

आज कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी यांच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निर्धार मेळाव्याचे उद्घाटन मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. राज्यात अखंड बहुजन समाजाने महायुतीला साथ देण्याची भूमिका घेतली असून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी सदैव कटिबद्ध आहे, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी आश्वस्त केले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या विजयाचा निर्धार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. 

यावेळी बहुजन समता पार्टीचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, महिला आघाडी अध्यक्ष प्रा. पुष्पलताताई सकटे, उपाध्यक्ष वसंतराव सकटे, कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, शिवसेना तालुका पदाधिकारी राजेंद्र माने, माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, रणजित पाटील, बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते आदी पदाधिकारी, तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अंकिता पाटील यांचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कराडकर यांच्या वतीने सत्कार

लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड

रेठरे खुर्द गावकऱ्यांनी केलेला माझा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी