कराड उत्तर चे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त १० जानेवारी रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

*कराड उत्तर चे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त १० जानेवारी रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन 

कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला
सातारा लोकसभा मतदार संघाचे समन्वयक व 
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस व  रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि १० जानेवारी रोजी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३ नंतर रामकृष्ण वेताळ हे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सुर्ली ता. कराड येथील निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत.
युवा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर च्या वतीने सुर्ली ता. कराड येथे सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते होणार आहे.सु साईनाथ गोपालन संस्था येथे गाईंना चारा वाटप
यानंतर नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला आदरांजली वाहून ते सकाळी १० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड कार्यालयाला सदिच्छा भेट देणार आहेत.उंब्रज येथील जागृती आश्रमशाळा येथील विदयार्थ्यांना स्नेहभोजन,पाल ता. कराड येथील श्री खंडोबा दर्शन घेऊन पाल  येथील योगेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण समारंभ रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते होणार आहे. , वळसे ता.जि. सातारा येथील एहसास मतिमंद शाळा येथे  फळ वाटप ,तसेच नागझरी ता. कोरेगाव येथील संत रोहिदास आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन समारंभ होणार असून दुपारी ३ वाजता सुर्ली ता. कराड येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती  रामकृष्ण वेताळ युवा मंच च्या वतीने देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त