आदर्श विद्यालय आगाशिवनगर मध्ये स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन*

कराड वार्ता न्युज 
आदर्श विद्यालय आगाशिवनगर मध्ये स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन*
     श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुविहार ,आगाशिवनगर मध्ये.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सचिन शिंदे शिशुविहारच्या मुख्याध्यापिका-लता नलवडे .सांस्कृतिक विभाग प्रमुख- सौ. प्राजक्ता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत.विद्यार्थी प्रतिनिधी-वेदांत घारे व मल्हार माळी यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्राजक्ता पाटील यांनी जिजाऊ चरित्राविषयी माहिती सांगितली जिजाऊ चरित्रातून निर्भीडपणा,  कणखरपणा, शौर्य,समता,न्यायवृत्ती,बुद्धी. प्रामाण्यवाद हे गुण सर्व मानवजातीसाठी आदर्शवत आहेत.असे मत व्यक्त केले.तर सौ अश्विनी यादव यांनी स्वामी विवेकानंद एक भारतीय संन्यासी तत्त्वज्ञ होते सर्व शिक्षणाचे अंतिम ध्येय माणूस निर्माण करणे हे आहे हा स्वामी विचार सांगून विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली.
 यानंतर विद्यार्थी मनोगते झाली विद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी भाषणे केली.या कार्यक्रमाचे आभार सौ रुपाली कुंभार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.