आंदोलन तीव्र करण्याचा निर्णयमहाराष्ट्रातील सर्व वाहतूकदार चालक-मालक बंधुंनो

आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय

महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदार चालक-मालक बंधुंनो

केंद्र सरकारने केलेल्या हिट अँड रन प्रकरणी कळ्या कायद्याच्या विरोधामध्ये, महाराष्ट्रातील सर्व ऑटो टॅक्सी ट्रक टेम्पो बस व सर्व प्रकारचे वाहतूकदार चालक-मालक लढा देत आहेत परंतु वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे व वेगवेगळे आंदोलन सुरू असल्यामुळे याचा परिणाम दिसून येत नाही,

परंतु सर्वांनीच मात्र 9 तारखेला मध्यरात्रीपासून चक्काजाम स्टेरिंग थोडो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल सर्वांचे एकमत दिसून येत आहे, हा लढा अधिक व्यापकपणे व एकजुटीने पुढे घेऊन जाण्याची आता गरज आहे,

 ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, गेल्या दहा दिवसापासून दिल्ली येथे तळ ठोकून बसले असून नुकताच त्यांनी पंजाब येथे जाऊन पंजाब मध्ये देखील आंदोलन सुरू केले आहे व पंजाब मध्ये सध्या बंद असून सर्व वाहने रस्त्यावरती थांबून आहेत व बंद यशस्वी झालेला आहे,

अशा परिस्थितीमध्ये देशभरातील सर्व 25 करोड चालक-मालकांची लक्ष महाराष्ट्र कडे महाराष्ट्रातील संघटनांच्या भूमी भूमिकेकडे आहे,

 नऊ तारखेपासून आपापल्या जिल्ह्यामध्ये तीव्रपणे परंतु लोकशाही मार्गाने अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन बाबा कांबळे व इतर सर्व संघटनांनी केले आहे हे आंदोलन सुरू ठेवून सर्व संघटनांची एक मत करण्यासाठी एकत्र यावे अशी आव्हान देखील या माध्यमातून आम्ही करत आहोत,

9 जानेवारी 2024 पासून महाराष्ट्रातील सर्व ड्रायव्हर चालक-मालक यांनी शांततापूर्ण मार्गाने स्टेरिंग सोडून चक्काजाम करत जिल्हाधिकारी कार्यालय व इतर विविध ठिकाणी आंदोलन करावे असे नम्र आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे कळावे आपला नम्र 

    गफार नदाफ
 महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष 
 राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी व बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन 
🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.