मलकापूर 24x7 सौ. निलम धनंजय येडगे,

मलकापूर 24x7 

सौ. निलम धनंजय येडगे,

नगराध्यक्षा, मलकापूर नगरपरिषद, जि. सातारा
मलकापूर म्हणजे नाविण्यपूर्ण योजना, नाविण्यपूर्ण संकल्पना साकारणारे सर्व संपन्न शहर, मलकापूर म्हणजे गेल्या 15 वर्षापासुन अखंडपणे 24x7 पध्दतीने 24 तास पाणी पुरवठा करणार शहर, मलकापूर म्हणजे आदर्श सोलरसिटी, मलकापूर म्हणजे स्वच्छ व सुंदर शहर, मलकापूर म्हणजे विकासाची प्रयोगशाळा, विकासाचे माहेरघर म्हणजे मलकापूर, हे सार झाल फक्त आणि फक्त मा. पृथ्वीराज बाबांच्या संकल्पनेतून आणि व कै. भास्कररावजी शिंदे दादा यांच्या प्रेरणेतुन. . . . .

मलकापूर शहराच्या विकासामध्ये मा. आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेच नव्हे तर संपूर्ण चव्हाण कुटुंबाचे मोलाचे योगदान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विकासात्मक दृष्टीकोण असणाऱ्या बाबांनी मलकापूरला नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या सेमीनारमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला 24x7 योजनेबध्दल देशाला मार्गदर्शन करण्याची संधी केवळ बाबांच्या मुळे ते केंद्रीयमंत्री असताना प्राप्त झाली. यामुळे केवळ मा. मनोहर शिंदे भाऊच नव्हे तर बाबांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचा उत्साह व प्रोत्साहन मिळाले. मा. बाबांचे कुटुंब व मनोहर भाऊंचे कुटुंबयांचे पिढीजात कौटुंबिक संबंध अगदी त्यांचे वडिल कै. स्वा. सै. मा. आ. भास्कररावजी शिंदे यांचे पासुनचे त्याची आजही त्याच जिव्हाळ्याने जपणूक झालेली आहे. 

देशाच्या राजकारणात एक निष्कलंक, स्वच्छ प्रतिमा, उच्चविद्या विभुषित व्यक्तिमत्वाबरोबर काम करायला मिळण हे भाऊंच माझ भाग्य आहे. मलकापूर शहराला रोल मॉडेल बनविण्याच स्वप्न केवळ आणि केवळ बाबांच्या मुळे साकार झाल, सन 2013 मध्ये झालेली 17-0 झालेली पंचवार्षिक निवडणूक म्हणजे जनतेने बाबांच्यावर व भाऊंच्या वर दाखवलेला विश्वासाची दिलेली पोहोच पावती. सन 2008 साली ग्रामपंचायत बरखास्त करुन 24x7 नळपाणीपुरवठा योजनेच्या उभारणीला सुरुवात केली, यामध्ये खुप अडचणी आल्या, लोकांचे अनेक समज-गैरसमज दूर केले ते केवळ बाबांच्या दूरदृष्टीच्या सकारात्मक विचार शैली मुळे हे यश प्राप्त झाल. जनतेने या उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्वावर व त्यांच्या सामाजिक कार्यावर दाखविलेला हा एक विश्वासचआहे. मा. बाबांनी कै. भास्कररावजी शिंदे यांचे कार्य पुढे चालविण्याचे काम व जबाबदारी त्यांनी मा. मनोहर भाऊंच्या वर टाकली. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी श्री. मनोहर भाऊंना त्यांच्या आशिर्वादामुळे नेहमीच बळ मिळत राहिल.

आज मलकापूरची ओळख जगाच्या नकाशावर वेगळ्या प्रकारे झाली आहे. सन 1990 नंतर मलकापूर शहराची शीघ्र गतीने झालेली वाढव भविष्यात होणा-या वाढीचा विचार करून, आज रोजी सुरु असलेली 24x7 नळपाणी पुरवठा योजनेची सुरुवात सन2001 मध्ये अनेक अडचणींवर मात करून केली. आधुनिक पध्दतीनेे साकारलेल्या या पथदर्शी योजनेतून नागरिकांना स्वच्छपाणी देण्याबरोबरच, पाणी वापराप्रमाणे बिलींग केल्यामुळे शहरातील नागरिकांना हवे त्यावेळी पाणी मिळू लागलेमुळे लोकांच्या पाणी वापरात बचत झाली. परिणामी पाणी बचत व विज बचत होऊन नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे. अश्या, एका आर्दश योजनेस आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. हे यशाची देशपातळीवर दखल घेत अशा प्रकारच्या नाविण्य पूर्ण योजनेचा अनेक गावानी व शहरानी स्विकार केला आहे. या योजनेच्या अनुभवावरूनच केंद्रशासनाच्या स्मार्टसिटी प्रकल्पात मीटरद्वारे पाणी पुरवट्याची संकल्पना केंद्रशासनाने समाविष्टकेलेलीआहे.

पंधरावर्षापूर्वी मलकापूर ही एक ग्रामपंचायत होती. मलकापूर गावाच्या सभोवती वाढत असलेल्या अमर्यादित लोक संख्येची होणारी वाढ विचारात घेऊन ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या निधीतून शहराचा विकास होणार नाही हि दूरदृष्टी ठेऊन सत्तेमध्ये असतानाही ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत करण्याचा धाडशी निर्णय घेऊन महाराष्ट्रातील मलकापूर हि चौथी नगरपंचायत स्थापन केली. या नगरपंचायतीच्या स्थापनेमध्ये मा. आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांचे मोठे पाठबळ लाभले. 

शहराची अमर्यादित होणारी वाढ विचारात घेऊन ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या निधीतून शहराचा विकास होणार नाही हि दूरदृष्टी ठेऊन सत्तेमध्ये असतानाही ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत करण्याचा धाडशी निर्णय दादांनी घेऊन महाराष्ट्रातील मलकापूर हि चौथी नगरपंचायत स्थापन केली. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर दादांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तसेच ग्रामपंचायतीकडे कार्यरत सर्व गरीब सामान्य कुटुंबातील कर्मचा-यांचा समावेश नगरपंचायतीच्या आकृतिबंधामध्ये आग्रहाने विशेष बाब म्हणून करून घेतला.

शहरातील मुलींचे शिक्षण व सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियानाचा शुभारंभ दिनांक 7 जुलै 2013 रोजी केला. या आदर्श योजनेंतर्गत मुलींना मोफत पास व स्वतंत्र बस असल्यामुळे दर वर्षी शहरातील अंदाजे 500 मुली लाभ घेत असून, पालक आपल्या मुलीच्या सुरक्षितते बाबत निर्धास्त झाले आहेत.

सध्याचे मुलींच्या जन्माचे घटते प्रमाण विचारात घेता मलकापूरात जन्मलेल्या मुलीसाठी" प्रियदर्शनी कन्यारत्न योजना "दिनांक 19 नोव्हेंबर 2011 पासून सुरू केली. नगरपरिषद व कराड अर्बन बँक यांच्या सयुक्त विद्यमाने शहरात जन्मलेल्या प्रत्येक मुलीस वयाच्या एकविसाव्या वर्षी रुपये 1 लाख मिळण्याची सोयके ली. शहरातील आतापर्यन्त अंदाजे 400 मुलींना रुपये 4.00कोटी रक्कमेचा लाभ मिळाला आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारीक उर्जा वापर ही काळाची गरज ओळखून शहरात सोलर सीटी योजना प्रकल्प सुरू केला. या योजनेंतर्गत नगारपंचायतीने कांही हिस्सा भरून प्रोत्साहन दिले. आज शहरातील हजारावर लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेतला असून लाभार्थीना घरपट्टीमधे 10 टक्के सूट देऊन नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. यासाठी मलकापूर नगरपरिषदेला महाऊर्जा विकास अभिकरण महामंडळाचा ऊर्जा बचतीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

शहरातील ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण झाले पाहिजे असा सल्ला दादांनी दिला होता. त्यानुसार नगररिषदेने आज देशातील पहिला "रोटरी मकॅनिकल पध्दतीचा घनकचरा प्रकल्प" यशस्वीपणे सुरू केला आहे. या प्रकल्पातून तयार झालेल्या खताला शासनाकडून "मलकापूर हरित महासीटी कंपोस्ट" ब्रँड असे नावही मिळाले आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्याने स्वर्गीय दादांचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे.

अशा अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी झालेनंतर शहरामध्ये भुयारी सांडपाणी प्रक्रिया योजना घेण्याबाबत दादा नेहमी आग्रही होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन सन 2013 मध्ये मलकापूर शहरासाठी 42 कोटी किमतीची भुयारी गटार योजना मंजूर झाली. कराड शहरानंतर सातारा जिल्यात भुयारी गटर योजना राबवणारे मलकापूर हे दुसरे शहर व राज्यातील पहिली नगरपरिषद आहे. घरा-घरातील सांडपाणी जोडणीचे काम सुरु आहे. भविष्यात उघड्यावरील सांडपाण्यापासून होणाऱ्या आजारापासून नागरिकांना मुक्ती मिळेल नागरिकांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. या योजनेत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा गो-का-क सह. पाणीपुरवठा संसथेच्या माध्यमातुन शेतीसाठी पुनर्वापर करणे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले होते.

मलकापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी जागा तत्कालीन ग्रामपंचायतीस व सध्याच्या नगरपरिषदेस मिळण्यासाठी कै. भास्करराव शिंदे दादांनी तब्ब्‍ल 14 वर्षांपासून सुरु केलेल्या प्रयत्नास यश प्राप्त झाले असून, नगरपरिषदेस एक हेक्टर चौदा गुंठे जागा प्रशासकीय इमारतव अग्निशामक केंद्रास ताब्यात मिळाली आहे. आज या जागेवर, अग्निशामक केंद्र उभारणीचे काम पुर्ण झाले असून, 50 हजार चौरस फुटाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीचे काम अंतीम टप्यामध्ये असुन सन 2024 मध्ये त्या ठिकाणी नगरपरिषदेचे कार्यालय सुरु करणेत येणार आहे. 

तत्कालीन मलकापूर ग्रामपंचायतीचे काळात पुनर्वसित झालेल्या झोपडपट्टीतील कुटुंबाना मुलभूत सुविधेअंतर्गत पिण्याचे पाणी, रस्ते, गटार, संरक्षक भिंत इत्यादि सुविधा तसेच प्रत्येक कुटुंबाना स्वतःचे हक्काचे घर असावे अशी त्याची इच्छा होती. आज पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टीमध्ये 1000 कुटुंबाना स्वतःचे हक्काचे घर मिळणेचा प्रस्ताव तयार करणेत आला आहे.

मलकापूर नगरपरिषदेने Best Urban Local Body या आस्थापने अंतर्गत सादर केलेल्या स्पर्धात्मक शहरामध्ये देशातील बहुतांश मोठ्या शहरांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्या सर्वामधून देशात 3 ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मलकापूर नगरपरिषदेस जाहिर करण्यात आलेला आहे. या विभागामध्ये प्रथम क्रमांक चंदिगड, द्वितीय क्रमांक इदौंर शहराला देण्यात आलेला असून, मलकापूर व सुरत या दोन्ही शहरांना 3 ऱ्या क्रमाकांचा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. देशामध्ये चंदिगड व इंदौर हि अतिशय नियोजनबद्ध, विकसित झालेल्या व स्वच्छ सर्व्हेक्षण कायम सातत्य राखणारी शहरे असून या शहरांच्या यादीत मलकापूर नगरपरिषदेने आपले समाविष्ठ केले असलेने मलकापूर शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. सदरचा पुरस्कार विशेषबाब म्हणजे अर्बन लोकल बॉडीज् या घटकांतर्गत प्राप्त झाला असून हे यश मलकापूर नगरपंचायत 2009 ते नगरपरिषद 2023 अंतर्गत काम केलेल्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे आहे. 

तसेच मलकापूर नगरपरिषद 24x7 नळपाणीपुरवठा योजना ही सन 2030 साल गृहित धरुन डिझाईन केली होती परंतू मलकापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सद्याचे अंदाजे 45000 लोकसंख्येस पाणीपुरवठा करण्यासाठी योजना 20 ते 22 तास पंपींग करुन चालविली जात आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा विचार करुन 2054 ची 106000 गृहित धरुन केंद्रशासनाच्या अमृत 2.0 अभियानाअंतर्गत 24x7 पाणीपुरवठा योजना विस्तार व बळकटीकरणाचा प्रस्ताव दाखल केल्याप्रमाणे त्यास मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) तसेच पालकमंत्री मा. ना. शंभुराज देसाई, मा. आ. सतेज पाटील, मा. आ. विश्वजित कदम, मा. उदयसिंह पाटील प्रदेश काँग्रेस सरचिटणीस यांचे विशेष सहकार्यातुन नोव्हेंबर 2023 मध्ये रक्कम रुपये 18.61 कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन शासन निर्णय झाला आहे. 

तसेच मलकापूर नगरपरिषद 24x7 नळपाणीपुरवठा योजनेप्रमाणे मलकापूर शहरास सन 2024 ला 24 तास घरगुती गॅस उपलब्‌ध होणार आहे. सदरचा गॅस स्फोटक विरहित असुन शहरामध्ये गॅस स्फोटामुळे होणा-या दुर्घटना टाळता येणार आहेत. 

मा. पृथ्वीराज बाबांनी व कै. भास्कररावजी शिंदे यांचे कार्य पुढे चालविण्याचे काम व जबाबदारी त्यांनी मा. मनोहर भाऊंच्या वर टाकली. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भाऊंना त्यांच्या आशिर्वादामुळे नेहमीच बळ मिळत राहिल.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.