लिलाबाई चव्हाण यांचे निधन
लिलाबाई चव्हाण यांचे निधन कराड ः कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे चोपदार वैकुंठवासी ह.भ.प. मुगुटराव चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती लिलाबाई मुगुटराव चव्हाण (वय ७०) यांचे आज आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, दीर, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा धार्मिक कार्यात सहभाग होता. मनमिळाऊ स्वभावामुळे त्या चव्हाण मावशी म्हणून परिचित होत्या. त्यांनी अनेक पंढरपुर वारी पायी चालत केल्या होत्या. सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव संभाजी चव्हाण यांच्या त्या वहिनी, वीज तांत्रिक कामगार युनियन बारामती झोन सचिव राम चव्हाण आणि दैनिक सकाळचे जाहिरात सहाय्यक व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन विधी गुरुवारी (ता. १) सकाळी साडेआठ वाजता कोपर्डे हवेली येथील स्मशानभूमीत होईल.