कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला
कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला
कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील याने मंथन परीक्षेत 150 पैकी 140 गुण मिळवून राज्यात सहावा येण्याचा मान पटकावला तर सातारा जिल्ह्यात प्रथम आला रिशांकने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत 150 पैकी 138 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक मिळवला बीडीएस परीक्षेत शंभर पैकी 98 गुण मिळवून तो राज्यात तिसरा आला ऑलिपियाड मधील विज्ञान आणि इंग्रजी विषयात 87.52% आणि 96.53% गुण मिळवून त्याने सिल्वर पदक मिळवले जनरल नॉलेज मध्ये त्याला 93.2% गुण मिळवून त्याने सुवर्णपदक मिळवले वर्ग शिक्षिका गौरी पवार व सर्व सहकारी शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या आई सौ. नीलिमा निलेश पाटील व श्री. निलेश बाजीराव पाटील यांचे देखील त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होते
Comments
Post a Comment