रस्ते विकासासह पायाभूत सुविधांसाठी सदैव प्रयत्नशील : आ. डॉ. अतुलबाबा भोसले

रस्ते विकासासह पायाभूत सुविधांसाठी सदैव प्रयत्नशील : आ. डॉ. अतुलबाबा भोसले

नांदगाव येथे रस्ते विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन

नांदगाव, ता. २ : ग्रामीण भागाच्या प्रगतीत रस्ते विकास महत्वाचा असतो. रस्ते विकासासह उत्तम पायाभूत सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. नांदगाव (ता. कराड) येथे रस्ते विकासकामांच्या भूमिपूजन व उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून नांदगाव ते संजयनगर - रेणुका माता मंदिर रोडसाठी ८० लाख आणि नांदगाव (पेठभाग) येथील मुक्तेश्वरनगर रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख असा एकूण ९० लाखांचा निधी मंजूर झाला आह. या रस्ते विकासकामाचे भूमिपूजन व उद्‌घाटन आ. डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते वि. तु. सुकरे गुरुजी होते.

याप्रसंगी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले, की नांदगाव ते संजयनगर रस्ता अनेक दिवसांपासून व्हावा अशी या भागातील लोकांची सातत्याने मागणी होती. याबाबत पाठपुरावा करुन आपण हे रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. भागाची प्रगती व्हायची असेल तर रस्ते व दळणवळण व्यवस्था मजबूत होणे गरजेचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेत आल्यापासून, या देशात रस्त्याची अनेक कामे झपाट्याने सुरु आहेत. निवडून आल्यानंतर १०० दिवसांचा विकासाचा आराखडा करुन, या आराखड्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न केले. याचाच परिणाम म्हणून आपल्या गावातील रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. आपल्या मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव कटीबद्ध असून, लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी जबाबदारी पूर्ण सक्षमतेने पार पाडेन. 

यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, कृष्णा बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे, सरपंच हंबीरराव पाटील, माजी सरपंच डॉ. सुरेश सुकरे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते, विकास पाटील, पंकज पाटील, सुशांत पाटील, वसीम मुल्ला, विजय चव्हाण, पैलवान दिलीप पाटील, मारुती पाटील, पोपटराव पाटील, विकास पाटील यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत सुकरे यांनी प्रास्ताविक केले. हितेश सुर्वे यांनी आभार मानले.

चौकट

पोलिस चौकीच्या नव्या इमारतीसाठी प्रयत्न करणार
सातारा जिल्ह्यातील पहिली व अतिशय जुनी चौकी म्हणून नांदगाव येथील पोलीस चौकी ओळखली जाते. ही पोलिस चौकी कराड तालुका पोलीस ठाणे अंकित असून, याची इमारत जुनी झाली आहे. याठिकाणी भेट देऊन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पाहणी केली. या पोलिस चौकीच्या नवीन इमारतीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अर्चना शिंदे व पोलिस कर्मचाऱ्यांना दिली.

फोटो ओळी :

नांदगाव : रस्ते विकासकामाचे भूमिपूजन व उद्‌घाटन करताना आ. डॉ. अतुलबाबा भोसले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त