सहयाद्री सहकारी साखर कारखानाच्या हद्दीतभारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू
सहयाद्री सहकारी साखर कारखानाच्या हद्दीत
सातारा :
कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर ता.कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुकीसाठी 5 एप्रिल रोजी मतदान तर मतमोजणी 6 एप्रिल रोजी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुका हद्दीत सहयाद्री सहकारी साखर कारखाना यशवंतनगर ता.कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उक्त नमुद केलेल्या तालुका हद्दीतील शस्त्र परवानाधारकांनी रहात असलेल्या घराच्या बाहेर शस्त्र घेवून बाहेर पडण्यास तसेच वरील तालुक्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील शस्त्र परवाना धारकांनी शस्त्रासह वर नमूद तालुक्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू केले आहे.
Comments
Post a Comment