कराड अर्बनने विक्रमीे व्यवसायाचा ५८०० कोटींचा टप्पा ओलांडला डॉ. सुभाष एरम; बँकेची ऐतिहासिक उच्चांकी व्यवसायवृद्धी
कराड अर्बनने व्यवसायाचा ५८०० कोटींचा टप्पा ओलांडला
कराड वार्ता समूह
गतवर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये जवळपास ६५० कोटींची विक्रमी वाढ नोंदवित कराड अर्बन बँकेने मार्च २०२५ अखेर ५८३७ कोटींची व्यवसायपूर्ती केली आहे. तसेच नेट एन.पी.ए.चे प्रमाणदेखील 'शून्य' टक्के राखत यशाची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली..
कराड अर्बन बँकेने पार केलेला ५८०० कोटींचा टप्पा आणि बँकेची ऐतिहासिक उच्चांकी व्यवसायवृद्धी याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. एरम म्हणाले, सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी बँकेने गुढीपाडव्याच्या सुमूहूर्तावर 'सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर'चा शुभारंभ केला आहे. मार्च २०२४ मध्ये बँकेने ५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला होता. बँकेने नियोजनबद्ध वाटचाल करीत मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात यशाचे विविध ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत.
बँकेचे कुटुंबप्रमुख व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी बँकेच्या मार्च २०२५ पर्यंत एकूण ६७ शाखा कार्यरत असून संपलेल्या आर्थिक वर्षात नव्या पाच शाखा वाई, बार्शी, पंढरपूर, सांगोला, एम.आय.डी.सी. सातारा या शाखा ग्राहकसेवेत नव्याने रुजू झाल्या. रिझर्व्ह बँकेने नुकतीच हडपसर, चाकण, शिरवळ, इचलकरंजी, नातेपुते अशा नव्या पाच शाखांना मान्यता दिली असून पहिल्या तिमाहीतच या शाखा ग्राहकांच्या सेवेत रूजू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष समीर जोशी यांनी बँकेस एकूण ४५ कोटी इतका ढोबळ नफा, तर सर्व कर व तरतुदी वजा जाता २६.४७ कोटी इतका निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या २९ शाखांना १ कोटींपेक्षा अधिक नफा झाला आहे. तसेच, ४० शाखांनी एन.पी.ए.चे प्रमाण 'शून्य' राखण्यात यश मिळवले असल्याचे सांगितले.
बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी यांनी विलीनीकृत बँकांच्या १० शाखांचे केलेले रिलोकेशन व नवीन ५ शाखांद्वारे नवीन व्यवसायाच्या संधी विस्तारत बँकेने या १५ शाखांद्वारे अल्पावधीतच २५० कोर्टींपेक्षा अधिक व्यवसाय पूर्णतः नवीन असणाऱ्या ग्राहकांशी व्यवसायाचे नातेबंध दृढ करत साध्य केला असल्याचे सांगितले. वर्षअखेरीस एकूण एन.पी.ए. मध्ये केवळ ४ कोटींची वाढ झाली तर, जुन्या एन.पी.ए. मधून ३० कोटींची वसुली करण्यात आली.
Comments
Post a Comment