महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५'ला**राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार**पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण*

*'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५'ला*
*राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार*
*पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण*
  
   मुंबई, दि. २ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५' मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन  यांनी या  महोत्सवाला उपस्थित रहावे अशी विनंती  पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी येथे भेट घेवून विनंती केली असून त्यांच्या विनंतीला राज्यपाल यांनी संमती दर्शवून ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

          पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणारे लेझर शो, टेंट सिंटीचे आयोजन, विविध परिसंवाद, देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम याची माहिती त्यांनी राज्यपाल यांना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मे रोजी उद्घाटन होणार आहे मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर मंत्री या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत तसेच यावेळी होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना दिली.

      राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’  चरित्र ग्रंथ पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी  भेट दिला. कै.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांचे कार्य आजच्या पिढीला मार्गदर्शक असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.
००००
संध्या गरवारे/विसंअ/

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त