*दिल्ली येथे भाजप सरकार विरोधात काँग्रेस ओबीसी विभागाचे निषेध आंदोलन*

*दिल्ली येथे भाजप सरकार विरोधात काँग्रेस ओबीसी विभागाचे निषेध आंदोलन*
**************************
 *नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मोदी शासनाने द्वेषपूर्ण व सुडबुद्धीच्या भावनेने कारवाई करण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीला घातक आहे.सत्तेची मस्ती चढलेली भाजपा ईडीच्या माध्यमातून खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांच्यावर निराधार गुन्हे टाकून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाने लढा  सुरू केला असून दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अनिलकुमार जयहिंद ( यादव ) यांच्या नेतृत्वात काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.मोदी सरकारने सुडबुद्धीचे राजकारण थांबवावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी सांगितले या वेळी भानुदास माळी यांच्यासह शेकडो काँग्रेस ओबीसी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.*

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी