कराड तालुक्यातील कापिल येथील अश्विनी प्रमोद पाटील यांचा महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 ने पुण्यात होणार गौरव
कराड तालुक्यातील कापिल येथील अश्विनी प्रमोद पाटील यांचा महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 ने पुण्यात होणार गौरव
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्व व्यक्तींचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षीचा महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 कापील येथील अश्विनी प्रमोद पाटील यांना जाहीर झाला आहे अश्विनी प्रमोद पाटील या महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत कराड शहर अध्यक्ष आहेत
त्यांनी अनेक सामाजिक विषय चांगल्या प्रकारे हाताळले असून अनेक जणांना त्यांनी शासन दरबारी न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 हा जाहीर झाला आहे
हा सन्मान सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह. घोले रोड शिवाजीनगर पुणे 23 एप्रिल रोजी. दुपारी बारा ते दोन या वेळेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे अश्विनी प्रमोद पाटील यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे
Comments
Post a Comment