देशाला ऑलिम्पिकचे पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कराडच्या गोळेश्वरचे सुपुत्र पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.


    देशाला ऑलिम्पिकचे पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कराडच्या गोळेश्वरचे सुपुत्र पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यशासनाचे आभार मानले आहेत. याविषयी त्यांनी पत्र लिहले आहे.
    पै.खाशाबा जाधव यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची तेथून घोषणा केली आहे. केली. या निर्णयाचे स्वागत खा. श्रीनिवास पाटील यांनी केले असून पत्राद्वारे राज्य शासनाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, ना.देवेंद्र फडणीस, क्रिडा मंत्री संजय बनसोडे यांना याविषयी पत्र लिहले आहे.  त्यात म्हंटले आहे,  माझ्या सातारा लोकसभा मतदार संघातील गोळेश्वर गावच्या छोट्या खेड्यात जागतिक ऑलिम्पिकमध्ये भारतात पहिले वैयक्तीक पदक मिळविणारे पै.खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी महाराष्ट्रात यापुढे क्रीडादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा आपण केलीत याचा सार्थ अभिमान आम्हा सातारकरांना आहे.
    पै.खाशाबा जाधव यांच्या नावाने भारतीय पातळीवर कुस्तीप्रकारामध्ये पदक जिंकणा-या पैलवानांना पुरस्कार द्यावा अशी मागणी यापूर्वी मी लोकसभेत केली होती. महाराष्ट्र शासनाने कुस्ती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंना पै.खाशाबा जाधव यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्या खेळाडूला सन्मानित करावे. त्यांच्या नवाने राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धा सुरू करण्यासाठी भारत सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच महाराष्ट्रात पै.खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी कुस्ती स्पर्धा भरवण्यात यावी अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.