पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

*पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.*

*मंजूर कामे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी निर्देश दिले.*

पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा बैठक घेतली. पाटण विधानसभा मतदारसंघात शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते ३० जून २०२३ रोजी ई-भूमिपूजन संपन्न झाले होते. या विकासकामांचा आढावा मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी घेतला. सध्या पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व कामे सुरू करावीत, अशी सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली. ही विकासकामे करत असताना त्यांची गुणवत्ताही राखावी, झालेल्या कामांची छायाचित्रे अपलोड करावीत, तसेच टंचाईला सामोरे जावे लागू नये अशा पद्धतीने जलजीवन मिशनची कामे कालबद्ध वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी दिले. 

कांदाटी खोऱ्यातील १०५ गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला दरवर्षी सामोरे जावे लागते. कायमस्वरूपी हा प्रश्न मिटावा यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून साठवण क्षमता निर्माण करावी, अशी सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली. पाऊस कमी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये भेटी देऊन वस्तुनिष्ठ पर्याय उभे करावेत. या भागात अतिवृष्टी होत असल्याने येथे नागरी सुविधा पुरवित असताना दीर्घकाळ टीकतील असे रस्ते तयार करावेत, अशा सूचनाही त्यांनी याप्रसंगी दिल्या. 

या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त