महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज कराड शहरात मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज कराड शहरात मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चीब, सहप्रभारी एहसान खान, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ते मा. दीपक राठोड, महासचिव श्रीनिवास नालमवार, प्रदेश सरचिटणीस तारिक बागवान, सातारा जिल्हा प्रभारी अनिकेत नवले, सातारा जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, कार्याध्यक्ष अमित जाधव, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अजित केंजळे, कराड उत्तर काँग्रेस कमिटी अध्यक्ष निवास थोरात, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, देवदास माने, गणेश उबाळे, राजेंद्र यादव, श्रीकांत मुळे, अभिजित चव्हाण, दिग्विजय सूर्यवंशी, मुबीन बागवान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

हा मशाल मोर्चा गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने दिलेली खोटी आश्वासने, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, सरकारी नोकर भरती व स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण आदी फसव्या घोषणा यांचा पर्दाफाश करण्यासाठी आज *युवा आक्रोश-मशाल मोर्चा* आयोजित करण्यात आला होता. हा मशाल मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दत्त चौक येथून स्व. यशवंतराव चव्हाण समाधी पर्यंत काढण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त