सह्याद्री न्युज नेटवर्क कराड राज्य विधिमंडळ :: पावसाळी अधिवेशन*आज दिव्यांगांच्या शाळांसंदर्भात विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी शासनाची भूमिका मांडली.*

सह्याद्री न्युज नेटवर्क कराड 
राज्य विधिमंडळ :: पावसाळी अधिवेशन
*आज दिव्यांगांच्या शाळांसंदर्भात विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी शासनाची भूमिका मांडली.*

आज विधानसभेत लक्षवेधी सूचनांवरील चर्चेदरम्यान दिव्यांगांच्या शाळांच्या संदर्भात सन्माननीय सदस्य मा. आशीषजी जैस्वाल, मा. बच्चूजी कडू, मा. विनयजी कोरे, मा. नरेंद्रजी भोंडेकर यांनी विविध उपप्रश्न उपस्थित केले. यासंदर्भात मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी शासनाची भूमिका सभागृहात मांडली.

सन २०१५ साली दिव्यांगांच्या १२३ शाळांना अनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात आली. २०१८ साली या शाळांतील २,४६४ पदांना मान्यता दिली आहे. सन २०१५ पूर्वी ९३२ अनुदानित शाळांना मान्यता देण्यात आली असून त्यांत ४६,४६६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर विनाअनुदानित तत्त्वावर ८५६ शाळा असून त्यांत ३३,८०२ विद्यार्थी शिकत आहेत. तसेच दिव्यांगांच्या काही शाळांना विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे, परंतु अशा शाळांतील पदनिर्मितीला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही, अशी माहिती मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी या अनुषंगाने यावेळी सभागृहात दिली.

दिव्यांगांच्या शाळा, कार्यशाळा व विशेष शाळांतील पदनिर्मितीला मान्यता न मिळाल्याने त्या शाळांना अनुदान मिळत नाही. त्यासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. १९ जुलै २०२३ रोजी या समितीचा अहवाल विभागाला प्राप्त झाला असून इथून पुढे दिव्यांगांच्या शाळांना व त्यांतील पदांना मान्यता देताना धोरण काय असावे, याचे प्रारूप या अहवालात मांडले आहे. हे प्रारूप तपासून सर्वंकष धोरण तीन महिन्यांच्या आत मान्यतेसाठी मंत्रिमंडळापुढे ठेवले जाईल, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. या धोरणानुसार दिव्यागांच्या शाळांतील पदांना मान्यता दिली जाईल आणि अनुदान वितरित करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. गतवर्षी १,१५५ कोटी रुपयांची तरतूद शाळांच्या अनुदानासाठी करण्यात आली होती, तर २०२३-२४ या वर्षासाठी १,३७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांप्रति सरकार संवेदनशील असून त्यांच्या विकासाच्या दृष्टीने शासन कटिबद्ध असल्याचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी सभागृहात सांगितले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.