योगाचे शास्त्र आणि स्वामींचे वस्त्र जीवनाला लाभलेला महत्त्वाचा पैलू - डाॅ.जान्हवी इंगळे सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला (प्रतिनिधी अक्कलकोट, ) - - योग अभ्यास आणि सध्याची जीवनशैली यांचा मेळ साधण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो, हा मुळात लोकांचा गैरसमज आहे. आज वयाच्या या वळणावरही नियमितपणे माझा संपूर्ण वेळ योग अभ्यासाला देत असल्याने अनेक कठीण प्रसंगांना तोंड देताना योगाभ्यासाने राग, लोभ आणि अस्वस्थतेपासून दूर ठेवले. अर्थात योग हे शास्त्र आहे, आरोग्यरक्षणाचा, ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. त्यामुळे त्याला कोणताही धर्म नाही, असे मला वाटते. आज योग शिकवताना अनेक देशांमधले विद्यार्थी. तसेच निरनिराळी माणसे भेटतात, वेगवेगळे धर्म, पंथ आणि वर्णाच्या या लोकांमध्ये वावरताना जरादेखील शंका मनात निर्माण होत नाही. कारण, आपण माणसांना जगणं शिकवणारे शिक्षक आहोत, हे आता मनाशी पक्के झाले आहे. ज्यांना विकार आहेत, त्यांचे विकार बरे करण्यासाठी योग आहे. ज्यांना विकार नाहीत, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग आहे. तो कोणत्या धर्माचा नाही, कोणत्या जातीचा नाही. हे पटवून देताना मी अनेकांना सांगत असते एखादे आसन किंवा ध्यानधारणा करताना प्रार्थनेचा प्रश्न येतो. तेव्हा तुम्हाला आवडेल ती प्रार्थना म्हणा, यासाठी भाषा आणि धर्म गरजेचा नाही. जिथे मन एकाग्र होते, ती शाश्वत आनंद प्राप्त करण्याची शैली योग अभ्यासातून प्राप्त होते. यास अनुसरून माझी भक्ती आणि निष्ठा येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांवर आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने व योगाभ्यासाने माझे मन एकाग्र होते. ते माझ्या जीवनातील शाश्वत आनंद आहे. म्हणून आज येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर लाभलेले स्वामींचे वस्त्र व योगाचे शास्त्र हे 'योगशास्त्र आणि स्वामींचे कृपा वस्त्र म्हणजे माझ्या जीवनाला लाभलेला महत्त्वाचा पैलू आहे असे मनोगत साताऱ्याच्या रहिवासी व अमेरिकेतील ग्रेस लेडी ग्लोबल अकॅडमीकृत मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित असलेले डाॅ.जान्हवी इंगळे यांनी व्यक्त केले. त्यांनी नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी डॉ जान्हवी इंगळे बोलत होत्या . मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे यांनी डाॅ.जान्हवी इंगळे यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याच बरोबर *श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्री अमोलराजे भोसले यांनी देखील स्वामींचे कृपा वस्त्र स्वामींची प्रतिमा, श्रीफळ देऊन अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला*. यावेळी *अमोलराजे यांनी योग कार्याचे जागतिक विश्वविक्रमाचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या*..... याप्रसंगी महेश इंगळे यांनी सांगितले डॉ जान्हवी इंगळे या एक उच्च विद्याविभुषीत संगणक अभियंता आहेत. शिक्षणाबरोबरच त्यांनी आरोग्य शिक्षणाचा ध्यास गांभीर्याने घेतला आहे, त्यामुळे नियमित योगासन करण्याचा छंद त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जोपासलेला आहे. या योगा क्षेत्रात आता त्या गेल्या पंधरा वर्षांपासून योग साधना करत आयुष मिनिस्ट्री गव्हर्नमेंट सर्टिफाईड योगा शिक्षिका व योगा डिप्लोमा धारक आहेत. योग शाळेच्या माध्यमातून त्या ऑनलाइन माध्यमातून देश विदेशातील नागरिकांना विद्यार्थ्यांना मोफत योगाभ्यासाचे महत्त्व पटवून प्रात्यक्षिक व धडे देत आहेत. जान्हवी यांनी १३ सप्टेंबर २०२० रोजी सिद्धासन आसनामध्ये ५ तास १ मिनिट १७ सेकंद आसनस्थ राहून नवीन विश्वविक्रम केला. या विक्रमाची नोंद योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. २०२१ मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये १ तास १९ मिनिट ३४ सेकंदामध्ये १० हजार वेळा महिलांना उपयुक्त भद्रासन करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करीत तो समस्त महिलांना समर्पित केला. तिसरा विश्वविक्रम 8 तास 13 मिनिटे सुप्तबद्धकोनासन मध्ये केला.तसेच त्या राष्ट्रीय ब्रॅण्ड अम्बेसिडर आहेत.अशा या विश्वविक्रम वीर जान्हवी यांना योगाभ्यासाने सुदृढ आरोग्य तर लाभलेले आहेच परंतु स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांना जीवनात सुख समृद्धी व ऐश्वर्य लाभू दे याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी त्यांच्या प्रति नेहमीच प्रार्थना असतील अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, मनोज कामनुरकर, संतोष जमगे, अविनाश क्षीरसागर, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.फोटो ओळ - डाॅ.जान्हवी इंगळे यांचा देवस्थान कार्यालय आणि अन्नछत्र येथे सत्कार करताना देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे आणि अन्नछत्र चे विश्वस्त श्री अमोलराजे भोसले हे दिसत आहेत.

योगाचे शास्त्र आणि स्वामींचे वस्त्र जीवनाला लाभलेला महत्त्वाचा पैलू - डाॅ.जान्हवी इंगळे                                                                                                                (प्रतिनिधी अक्कलकोट, ) -     
             - योग अभ्यास आणि सध्याची जीवनशैली यांचा मेळ साधण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो, हा मुळात लोकांचा गैरसमज आहे. आज वयाच्या या वळणावरही नियमितपणे माझा संपूर्ण वेळ योग अभ्यासाला देत असल्याने अनेक कठीण प्रसंगांना तोंड देताना योगाभ्यासाने राग, लोभ आणि अस्वस्थतेपासून दूर ठेवले. 

अर्थात योग हे शास्त्र आहे, आरोग्यरक्षणाचा, ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. त्यामुळे त्याला कोणताही धर्म नाही, असे मला वाटते. आज योग शिकवताना अनेक देशांमधले विद्यार्थी. तसेच निरनिराळी माणसे भेटतात, वेगवेगळे धर्म, पंथ आणि वर्णाच्या या लोकांमध्ये वावरताना जरादेखील शंका मनात निर्माण होत नाही. कारण, आपण माणसांना जगणं शिकवणारे शिक्षक आहोत, हे आता मनाशी पक्के झाले आहे. ज्यांना विकार आहेत, त्यांचे विकार बरे करण्यासाठी योग आहे. 

ज्यांना विकार नाहीत, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग आहे. तो कोणत्या धर्माचा नाही, कोणत्या जातीचा नाही. हे पटवून देताना मी अनेकांना सांगत असते एखादे आसन किंवा ध्यानधारणा करताना प्रार्थनेचा प्रश्न येतो. तेव्हा तुम्हाला आवडेल ती प्रार्थना म्हणा, यासाठी भाषा आणि धर्म गरजेचा नाही. जिथे मन एकाग्र होते, ती शाश्वत आनंद प्राप्त करण्याची शैली योग अभ्यासातून प्राप्त होते. यास अनुसरून माझी भक्ती आणि निष्ठा येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांवर आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने व योगाभ्यासाने माझे मन एकाग्र होते. 

ते माझ्या जीवनातील शाश्वत आनंद आहे. म्हणून आज येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर लाभलेले स्वामींचे  वस्त्र व योगाचे शास्त्र हे 'योगशास्त्र आणि स्वामींचे कृपा वस्त्र म्हणजे माझ्या जीवनाला लाभलेला महत्त्वाचा पैलू आहे असे मनोगत साताऱ्याच्या रहिवासी व अमेरिकेतील ग्रेस लेडी ग्लोबल अकॅडमीकृत मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित असलेले डाॅ.जान्हवी इंगळे यांनी व्यक्त केले. 

त्यांनी नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी डॉ जान्हवी इंगळे बोलत होत्या .

 मंदिर समितीच्या वतीने समितीचे  अध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे यांनी डाॅ.जान्हवी इंगळे यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. 

याच बरोबर *श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त  श्री अमोलराजे भोसले यांनी देखील स्वामींचे कृपा वस्त्र स्वामींची  प्रतिमा, श्रीफळ देऊन अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला*.  

यावेळी *अमोलराजे यांनी  योग कार्याचे जागतिक विश्वविक्रमाचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या*....

. याप्रसंगी  महेश इंगळे यांनी सांगितले डॉ जान्हवी इंगळे या एक उच्च विद्याविभुषीत संगणक अभियंता आहेत. शिक्षणाबरोबरच त्यांनी आरोग्य शिक्षणाचा ध्यास गांभीर्याने घेतला आहे, त्यामुळे नियमित योगासन करण्याचा छंद त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जोपासलेला आहे.

 या योगा क्षेत्रात आता त्या गेल्या पंधरा वर्षांपासून योग साधना करत आयुष मिनिस्ट्री गव्हर्नमेंट सर्टिफाईड योगा शिक्षिका व योगा डिप्लोमा धारक आहेत. योग शाळेच्या माध्यमातून त्या ऑनलाइन माध्यमातून देश विदेशातील नागरिकांना विद्यार्थ्यांना मोफत योगाभ्यासाचे महत्त्व पटवून प्रात्यक्षिक व धडे देत आहेत. 
जान्हवी यांनी १३ सप्टेंबर २०२० रोजी सिद्धासन आसनामध्ये ५ तास १ मिनिट १७ सेकंद आसनस्थ राहून नवीन विश्वविक्रम केला. या विक्रमाची नोंद योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. २०२१ मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये १ तास १९ मिनिट ३४ सेकंदामध्ये १० हजार वेळा महिलांना उपयुक्त भद्रासन करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करीत तो समस्त महिलांना समर्पित केला. तिसरा विश्वविक्रम 8  तास 13 मिनिटे सुप्तबद्धकोनासन मध्ये केला.
तसेच त्या राष्ट्रीय ब्रॅण्ड अम्बेसिडर आहेत.

अशा या विश्वविक्रम वीर जान्हवी यांना योगाभ्यासाने सुदृढ आरोग्य तर लाभलेले आहेच परंतु स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांना जीवनात सुख समृद्धी व ऐश्वर्य लाभू दे याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी त्यांच्या प्रति नेहमीच प्रार्थना असतील अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. 

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, मनोज कामनुरकर, संतोष जमगे, अविनाश क्षीरसागर, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ - डाॅ.जान्हवी इंगळे यांचा देवस्थान कार्यालय आणि अन्नछत्र येथे सत्कार करताना देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे आणि अन्नछत्र चे विश्वस्त श्री अमोलराजे भोसले हे दिसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.