प्रत्येक रविवारी दिल्लीला जाणारी हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस रेल्वे आता सातारा व कराड येथे थांबणार


      प्रत्येक रविवारी दिल्लीला जाणारी हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस रेल्वे आता सातारा व कराड येथे थांबणार  सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला आहे. यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याने सातारा जिल्ह्यातून उत्तरेत जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
     हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस मिरजेतून प्रत्येक रविवारी धावणार आहे. मात्र या गाडीला सातारा व कराड येथे थांबा नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना मिरज किंवा पुणे रेल्वे स्थानकावर जावे लागत होते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत असल्याने ही गाडी कराड येथे थांबावी अशी मागणी विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. तसेच गोपाळ तिवारी यांनी त्यासाठी पुढे प्रयत्न केले. या मागणीची दखल घेऊन खा.श्रीनिवास पाटील यांनी सदरची रेल्वे गाडी कराड आणि सातारा येथील रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात यावी अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले असून हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस रेल्वे आता सातारा आणि कराड रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे.
     ही गाडी प्रत्येक रविवारी सकाळी ६:०२ वाजता कराड रेल्वे स्टेशनवरून सुटून सातारा, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण (मुंबई), वसई रोड (मुंबई), वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा येथे थांबून दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक शुक्रवारी रात्री ९:४० वाजता सुटून कराड रेल्वे स्टेशनला शनिवारी रात्री १०:३७ वाजता पोहोचेल. याशिवाय चंदीगढ-यशवंतपूर संपर्क क्रांती, निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती तसेच कोल्हापूर-अहमदाबाद व बेंगलोर-जोधपुर या रेल्वे गाड्यांना देखील कराड व सातारा येथे थांबा देण्याची मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.
      दरम्यान हजरत निजामुद्दीन ते मिरज एक्सप्रेस रेल्वे आता सातारा व कराड रेल्वे स्टेशनवर थांबणार असल्यामुळे गुजरात, राजस्थान आणि दिल्ली बरोबरच सातारा जिल्हा सुद्धा उत्तर भारताशी कनेक्ट झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.