कोकणला जोडणारा कराड-चिपळूण राष्ट्रीय मार्ग क्र.१६१ वरील पाटण ते संगमनगर धक्का रस्त्याचे काम नव्याने


      कोकणला जोडणारा कराड-चिपळूण राष्ट्रीय मार्ग क्र.१६१ वरील पाटण ते संगमनगर धक्का रस्त्याचे काम नव्याने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाकडून २१२.४९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी प्रशासकीय व केंद्रीय पातळीवर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यास यश आल्याने हा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
     कराड ते चिपळूण दरम्यानच्या म्हावशी ते संगमनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ह्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी गत वर्षापासून होती. तेव्हापासून या रस्त्याच्या कामाबद्दल खा.श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील होते. राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता व प्रादेशिक अधिकारी आणि केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री अशा तिन्ही स्तरावर खा.श्रीनिवास पाटील यांनी यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. 
      खा.पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांना दि.२६ जानेवारी २०२३ रोजी लिहलेल्या पत्रानुसार तशी मागणी केली होती. या पत्राची दखल घेऊन सदर रस्त्याचे सुधारीत अंदाजपत्रक मंजुरीकरिता मुख्य अभियंता कार्यालयास कळवले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी दि.२३ मार्च २०२३ रोजी खा.श्रीनिवास पाटील यांना पत्राद्वारे त्यावेळी कळवले होते. त्यावरून खा.श्रीनिवास पाटील यांनी दि.२६ एप्रिल २०२३ रोजी पत्र पाठवून सिडको भवन, मुंबई येथील मुख्य अभियंता व प्रादेशिक अधिकारी प्रशांत फेगडे यांना याविषयी विनंती केली. त्यानंतर प्रशांत फेगडे यांनी याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यावर पुन्हा एखदा खा.श्रीनिवास पाटील यांनी नितीन गडकरी यांना दि.१९ मे २०२३ रोजी पत्र लिहून याबाबत विनंती केली होती. याशिवाय संसदेच्या अधिवेशन काळात दिल्ली येथे नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खा.पाटील यांनी मागणी केली होती. यादरम्यान केंद्र स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करत असताना सदर रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे अनऔपचारिक कळाले होते. परंतू महाराष्ट्रातील इतर रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार होईपर्यंत या रस्त्याच्या औपचारिक मान्यतेला उशिर होत होता.
      केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने दि.१६ ऑगस्ट २०२३ रोजीच्या कळवलेल्या पत्रानुसार महाराष्ट्रातील एकूण ४० रस्त्यांसाठी ४ हजार ५०६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी पाटण मधील सदर रस्त्यावरील १३ किमीचे अंतर व अतिरिक्त शिल्लक कामासाठी २१२.४९ कोटी निधी मंजूर केला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून खा.श्रीनिवास पाटील हे पाटण ते संगमनगर धक्का रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय व केंद्रीय स्तरावर नियमितपणे पाठपुरावा करत आहेत. त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.