कराड साळशीरंबे गावचे युवा नेते व कराड तालुका भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष, श्री.पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

कराड साळशीरंबे गावचे युवा नेते व कराड तालुका भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष, श्री.पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि.25 ऑगस्ट रोजी 'कृष्णा हॉस्पिटल, कराड व डॉ.अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठान, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने साळशीरंबे, ता कराड येथे मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा येथील 120 विद्यार्थ्यांना वही, पेन, शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
हे आरोग्य शिबीर लक्ष्मी विष्णू मंदिर हॉल,साळशीरंबे याठिकाणी आयोजित केले होते. आणि यासाठी, मेडिसिन, सर्जरी, अस्थीरोग, हृदयरोग, दंतविकार, फिजिओथेरपी, बालरोग, कर्करोग, आणि कान-नाक-घसा यांवरील सर्व प्रकारच्या तपासण्या साळशीरंबे येथे करण्यात आल्या. या ठिकाणी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला.
साधारणपणे 150 ते 200 च्या आसपास रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यामध्ये रुग्णांचे रक्तदाब, साखर, इ.सी.जी. तसेच कान,नाक,घसा व हाडांच्या, डोळ्यांच्या अशा सर्वच तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय रूग्णांना मोफत औषधे देखील देण्यात आली. कॅम्पमधील ज्या रुग्णांना यापुढील उपचाराची आवश्यकता असेल त्यांना 'कृष्णा हॉस्पिटल' मध्ये विविध योजनांच्या माध्यमातून उपचार दिला जाईल.

या शिबिराचे संपूर्ण नियोजन हे  श्री.पंकज पाटील, कॅम्प प्रमुख डॉ.सचिन जगताप, कॅम्प सुपरवायझर, श्री.सुनील यादव, तर पी.आर.ओ.श्री सागर पवार व मा.सचिन साळुंखे यांनी केले.
तत्पूर्वी माजी आमदार श्री.आनंदराव पाटील (नाना) यांनी या शिबिराची फीत कापून शुभारंभ केला व यावेळी उपस्थित श्री.हणमंतराव कराळे, श्री.निसार मुल्ला, श्री युवराज पवार, श्री.तानाजी देशमुख, श्री.सतीश पाटील, श्री.जयवंत यादव, सरपंच सौ.प्रमिला कुंभार, यांनी श्री.पंकज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थितांचे आभार मानले.
माजी आमदार मा.आनंदराव पाटील (नाना) यांनी पंकज पाटील करीत असलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.