मसूर येथील मुख्य चौकात रोको आंदोलन करण्यात आले.

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला 
हणबरवाडी शहापूर उपसा सिंचन योजनेसाठी २८ डिसेंबर २०२२ ला मोटर पंप चालु करुन पाईपलाईन चाचणी झाली, तेव्हापासून आज अखेर ही योजना चालू नाही, योजना चालू करणेसाठी मसुरसह राजमाची, मेरवेवाडी, करवडी, वाघेरी, वडोली(नि), शहापुर, रिसवड, अंतवडी, माळवाडी, यादववाडी, चिखली, किवळ, खोडजाईवाडी, घोलपवाडी, वनवासमाची, निगडी, हणबरवाडी, वाण्याचीवाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने आज १८ रोजी मसूर येथील मुख्य चौकात रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपस्थित असलेल्या पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी यांनी पालकमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार दिनांक 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पाणीटंचाईच्या मीटिंगमध्ये सदरचा विषय मंजूर करून दिनांक 22 ऑगस्ट रोजी हणबरवाडी-शहापूर योजनेचे पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. तद्नंतर  सदरचे रस्ता रोको आंदोलन आमदार बाळासाहेब यांच्या सूचनेनुसार स्थगित करण्यात आले, मात्र लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे दिनांक 22 ऑगस्ट सदर योजनेचे पाणी न सुटल्यास पुन्हा दिनांक 23 रोजी पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.

या आंदोलनादरम्यान सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटी-चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी सरचिटणीस सौ. संगीता साळुंखे (माई),  प्रशांत यादव, डॉ. विजय साळुंखे, तानाजीराव साळुंखे, भाऊसाहेब चव्हाण, बाळासाहेब सुर्यवंशी, तानाजीराव जाधव, अशोक संकपाळ, भीमराव इंगवले, सुधाकर रामुगडे, संजय घोलप, अनिल चव्हाण, मोहन पवार, युवराज शिंदे, मसूरसह राजमाची, मेरवेवाडी, करवडी वाघेरी, वडोली(नि.), शहापूर रिसवड, अंतवडी, माळवाडी, यादववाडी, घोलपवाडी, वनवासनाची, निगडी, हणबरवाडी, वाण्याचीवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त