कृष्णा महिला पतसंस्थेतर्फे कराड येथे शुक्रवारी महिला स्नेहमेळावा

कृष्णा महिला पतसंस्थेतर्फे कराड येथे शुक्रवारी महिला स्नेहमेळावा सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

कराड, ता. १६ : येथील कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या ओगलेवाडी (ता. कराड) येथील नूतन शाखेचा शुभारंभ शुक्रवारी (ता. १८) भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सकाळी ११ वाजता महिला स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे २३ जानेवारी २००४ रोजी कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. या पतसंस्थेच्या तालुक्यात ४ शाखा असून, ओगलेवाडी येथे नवीन शाखा सुरू करण्यात येत आहे. या नव्या शाखेचे उद्घाटन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ११ वाजता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत टाऊन हॉल येथे होणाऱ्या महिला स्नेहमेळाव्यासाठी पतसंस्थेच्या मार्गदर्शिका सौ. उत्तरा सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेच्या अध्यक्ष श्रीमती अलका जाधव व उपाध्यक्ष सौ. राजश्री थोरात यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.