*कराड उत्तर विधानसभेच्या भाजपा सोशल मीडिया वॉर रूम चे उद्घाटन*

*कराड उत्तर विधानसभेच्या भाजपा सोशल मीडिया वॉर रूम चे उद्घाटन*.सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
 *स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वाँररूम कार्यान्वीत*.

*भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरातील विधानसभाक्षेत्र निहाय सोशल मीडिया वॉर रूम संघटीत करण्यात आली आहे. या वाँररूम च्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी निवडणूकीची तयारी करण्यासाठी सज्ज झाली आहे.पक्षाची ध्येय धोरणे लोकांच्या पर्यंत पोहचवणे आणि लोकांची मते आणि समस्या संघटनेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही वाँररूम सेतूचे काम करणार आहे.या वाँररूम चे*
 *उदघाटन उपमुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष मा चंद्रशेखर जी बावनकुळे व इतर मान्यवरांच्या हस्ते आज  करण्यात आले*.
       *259 कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील वाँररूम वर्धन हाईटस,ओगलेवाडी रोड सैदापूर,ता.कराड येथे* *साकारण्यात आली आहे. याचे लोकार्पण आज भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षी करण्यात आले*.
  *यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम दादा, भाजपा नेते मा. मनोज घोरपडे दादा, कराड उत्तर  विधानसभा निवडणूक प्रमुख मा. रामकृष्ण वेताळ, जिल्हा उपाध्यक्ष मा. सुरेश पाटील तात्या कराड तालुका अध्यक्ष महेश कुमार जाधव, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण, भाजपा जिल्हा सचिव दिपाली ताई खोत,सरचिटणीस शंकरराव शेजवळ, सरचिटणीस शहाजी मोहिते, शरद चव्हाण*, *बाळासाहेब पोळ,जयसिंग डांगे, अक्षय चव्हाण,नम्रता कुलकर्णी,प्रतिभा कांबळे, वैशाली मांढरे, प्रशात भोसले वार्ड रूम प्रमुख राहुल वेताळ, कंटेंट रायटर शकर पाटील, व्हिडिओ एडिटर कनया जेधे, सदस्य शुभम नलवडे,, कृष्णत साळुंके, आदी टीम उपस्थित होते*.
     *वाँररूम कार्यान्वित झालेने मतदार संघातील घडामोडींचा अहवाल नियमितपणे पक्षकार्यालयात पोहचवता येणार आहे*.
*भाजपा   पदाधिकारी व ग्रामस्थ  उपस्थित होते*. 

BJP Maharashtra  Devendra Fadnavis  Chandrashekhar Bawankule

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.