देशाला ऑलिम्पिकचे पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कराडच्या गोळेश्वरचे सुपुत्र पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

देशाला ऑलिम्पिकचे पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कराडच्या गोळेश्वरचे सुपुत्र पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यशासनाचे आभार मानले आहेत. याविषयी त्यांनी पत्र लिहले आहे. पै.खाशाबा जाधव यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची तेथून घोषणा केली आहे. केली. या निर्णयाचे स्वागत खा. श्रीनिवास पाटील यांनी केले असून पत्राद्वारे राज्य शासनाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, ना.देवेंद्र फडणीस, क्रिडा मंत्री संजय बनसोडे यांना याविषयी पत्र लिहले आहे. त्यात म्हंटले आहे, माझ्या सातारा लोकसभा मतदार संघातील गोळेश्वर गावच्या छोट्या खेड्यात जागतिक ऑलिम्पिकमध्ये भारतात पहिले वैयक्तीक पदक मिळविणारे पै.खाशाबा जाधव या...