फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारतींचे भूमिपूजन मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते व पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत संपन्न*

*फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारतींचे भूमिपूजन मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते व पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत संपन्न*

फलटण तालुक्यात आज माऊलींच्या पालखी आगमनाच्या पवित्र दिवशी फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारतींचे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यास त्यांच्यासमवेत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब उपस्थित राहिले. 

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत फलटण तालुक्यातील या ३ पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारती उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाने १३ कोटी ६४ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. प्रत्येकी ८५० चौरस मीटर क्षेत्रफळाचे दुमजली पोलीस ठाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास सज्ज होतील. या पोलीस ठाण्यांमुळे सुमारे ३ लाख ७० हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. १८ महिन्यांच्या कालावधीत अत्याधुनिक सुविधांसह या तीनही पोलीस ठाण्यांची उभारणी होईल.

याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. पोलिसांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून चांगले काम होते. फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचे बांधकाम या भूमिकेतून करण्यात येत आहे, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यात पोलीस विभागामार्फत महिला सुरक्षेसंदर्भात चांगला उपक्रम राबविण्यात आला. या पथदर्शी उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली, हे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी, औंध मसूर यांसह अन्य १३ गृहनिर्माण प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यास गृह विभागाने निधी उपलब्ध करून हे प्रकल्प मंजूर करावेत, अशी मागणी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली.

याप्रसंगी मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेजी भोसले, मा. रणजितसिंहजी नाईक-निंबाळकर,  आमदार मा. प्रवीणजी दरेकर, मा. शिवेंद्रराजेजी भोसले, मा. जयकुमारजी गोरे यांच्यासह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी,  पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या अधीक्षक अभियंता अलकनंदा माने, तसेच पोलीस विभागातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.