कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बुथ कमिटी मेळावासह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला 9156992811

*कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बुथ कमिटी मेळावा
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला 9156992811
 राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधानपरिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड व सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मंगल कार्यालय, मसूर फाटा, उंब्रज येथे मोठ्या  उत्साहात संपन्न झाला.*

कराड उत्तर मतदारसंघात बूथ कमिट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले, प्रत्येक बुथ कमिटी सदस्याने आपल्या बुथ मधील मतदार नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन वरिष्ठांमार्फत त्या सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. बूथ कमिटीने बूथ स्तरावर अधिक व्यापक व सक्रियपणे काम करून पक्ष संघटन मजबूत केले पाहिजे,  तसेच पक्षाचे कार्य व ध्येयधोरणे  सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवन्याचे काम बूथ कमिटी मार्फत करणे आवश्यक आहे, अशा प्रकारचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आय.टी. सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  अध्यक्ष देवराजदादा पाटील, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षिरसागर, जेष्ठ नेते लालासाहेब पवार, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे(माई),  सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, कांतीलाल पाटील, नंदकुमार बटाणे,  संतोष पाटील,  गंगाधर जाधव, हंबीरराव जाधव,  सोमनाथ जाधव, संभाजीराव गायकवाड, पै. संतोष वेताळ, प्रशांत यादव, उद्धवराव फाळके, दाजी पवार, सुधाकर जाधव, जयवंतराव मोहिते, जयंत जाधव, धनाजी जाधव, दुटाळ सर, मोहनराव जाधव रूपाली पावशे, कराड उत्तर महिला आघाडीच्या अध्यक्षा  सौ.सुरेखा डुबल, सौ.उर्मिला साळुंखे, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, विविध गावचे सरपंच उपसरपंच, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्ह.चेअरमन तसेच  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त