मुबई कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी निर्देश दिले.

मुबई कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी निर्देश दिले.*
पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील सातारा जिल्ह्यातील कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठक संपन्न झाली. कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी संबंधितांना दिल्या. या गावाच्या पुनर्वसनाबाबत मा. वन मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्यासमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यानिमित्ताने व्यक्त केला. 

या बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक रामानुजन, सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सहायक वनसंरक्षक गणेश पाटोळे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.