*कराडवासियांच्या मागणीचा आदर करून जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह*

*कराडवासियांच्या मागणीचा आदर करून जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह* 

 *कराड शहर काँग्रेसच्या मागणीला यश* 

 *कराड :* कराड शहरातील 24 तास पाणी योजनेच्या मिटर प्रमाणे पाणी बिलांच्या वसुलीवरील स्थगिती कायम ठेवताना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी जुन्या दराप्रमाणे वार्षिक पाणीपट्टी वसुली करण्यास नगरपालिकेस आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचीच मागणी आंदोलनातून कराड शहर काँग्रेस कमिटी ने शहर वासियांच्या वतीने केली होती. यामुळे कराड शहर काँग्रेस कमिटीच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

 *यानिमित्त कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे म्हणाले की,*  कराड शहरात मीटरने पाणी पट्टी आकारणी बाबत 1 एप्रिल 2022 रोजी पासून शहरात अंमलबजावणी केली होती परंतु याबाबत शहर वासियांच्या अनेक तक्रारी होत होत्या. मिटरने बिल आकारणी केल्यामुळे भरमसाठ बिल येतात, पाण्याचे मिटर हवेनेच फिरते तर हवेचे बिल का द्यायचे? अशा अनेक तक्रारी असून सुद्धा कराड नगरपालिका मिटरने बिल आकरत होती यामुळे शहरातील नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या मागण्या मधून एक कॉमन मागणी होती की, जोपर्यंत मिटर पद्धत सदोष पद्धतीने होत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीनेच पाणी बिल आकारले जावे ही मागणी आम्ही कराड शहर काँग्रेस कडून लावून धरली आणि याबाबत पाठपुरावा सुद्धा केला या आमच्या मागणीला आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यश आले आहे. आणि इथून पुढे सुद्धा सदोष मीटरने 24 तास पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत आमचा कराडवासियांसाठी लढा चालूच राहील.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात